Breaking
ब्रेकिंग

जन आरोग्य समितीची पहिली बैठक उत्साहात संपन्न

0 8 6 5 1 5

जन आरोग्य समितीची पहिली बैठक उत्साहात संपन्न

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २८/ हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना , नविन कोर्टा समोर अग्निशामक केंद्र हॉल, आयुष्मान आरोग्य मंदिर कुंभारवाडा व कानाड गल्ली, करमाळा या तिन्ही दवाखान्याच्या संयुक्त विद्यमाने जन आरोग्य समिती (JAS) ची पहिली बैठक नुकतीच उत्साहात संपन्न झाली.

सदर बैठकीमध्ये JAS समितीचे अध्यक्ष- नगरसेवक, सह. अध्यक्ष- तालुका आरोग्य अधिकारी, सचिव- वैद्यकीय अधिकारी, सचिव- तालुका आरोग्य अधिकारी, कार्यालयाचे प्रतिनिधी तसेच तिन्ही दवाखान्याचे आरोग्य कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिपरीचारिका, आरोग्य सेवक व नागरिक उपस्थित होते.

यावेळी आरोग्य संस्थेतील उपलब्ध सुविधा, औषधांचा साठा, आवश्यक साहित्य, स्वच्छता व्यवस्था, रुग्णांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा तसेच नागरिकांच्या आरोग्यविषयक अडचणी याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नागरिकांना दर्जेदार व वेळेवर आरोग्य सेवा मिळाव्यात, आरोग्य संस्थेतील समस्या स्थानिक पातळीवर सोडविण्यात याव्यात तसेच आरोग्य सेवांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा, यासाठी जन आरोग्य समितीच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येतील.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे