एस टी चालकाने वाचवले मोटार सायकल वाल्याचे प्राण चालक सानप यांचे होत आहे सर्व स्तरातून कौतुक
चालक सानप यांचे होत आहे सर्व स्तरातून कौतुक
एस टी चालकाने वाचवले मोटार सायकल वाल्याचे प्राण
चालक सानप यांचे होत आहे सर्व स्तरातून कौतुक

प्रतिनिधी : समीर तांबोळी
करमाळा : करमाळा डेपो येथील MH 40 N 9472 या एस टी बस चे चालक श्री . सानप यांच्या प्रसंगावधानामुळे एका दुचाकी चालकाचे प्राण वाचले . ऐनवेळी चुकीच्या मार्गाने येणाऱ्या दुचाकी चालकाचा जीव वाचला .
सदर घटनेची माहिती अशी की, करमाळा – सोलापूर या मार्गावर बस जात असताना कंदर येथे बस पोहचली असताना समोरून येणाऱ्या ट्रक च्या पाठीमागून येणारा मोटार सायकल चालकाने पुढील कोणतेही वाहन न पाहता अचानकपणे उजव्या बाजूस त्याची मोटार सायकल वळवली आणि त्याचा मोटार सायकल वरील ताबा सुटला . मोटार सायकल सरळ एस टी बस च्या खाली डाव्या बाजूस येऊन पुढच्या टायर ला आदळली . दुचाकी चालक गाडीच्या टायर खाली चिरडला जातो की काय असा प्रसंग निर्माण झाला होता .पण प्रसंगावधान राखून एसटी चालक श्री . सानप यांच्या सावधानतेमुळे मोठा अनर्थ टळला . घटना पाहणाऱ्यांनी श्वास रोखून धरले होते . पण चालकाचे प्रसंगावधान पाहुन सर्वांना कौतुक वाटले आणि सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला . एका व्यक्तीचे प्राण वाचवल्याने एसटी चालक श्री . सानप यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .


