Breaking
ब्रेकिंग

झेंडू, शेवंती,आष्टर फुल शेतीतून शेतकऱ्यांना आर्थिक समाधान….*

0 7 6 9 4 1

*झेंडू, शेवंती,आष्टर फुल शेतीतून शेतकऱ्यांना आर्थिक समाधान….*

वाळकी /  प्रतिनिधी :- दादा आगळे

सणासुदीच्या काळात सर्वत्र आनंदाचे वातावरण असताना नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील झेंडू उत्पादक शेतकऱ्यांनी झेंडू फुलाला चांगला भाव मिळाल्याने समाधान व्यक्त केले आहे.तसेच आर्थिक फायदा झाला आहे.

सततच्या पावसामुळे गुंडेगाव भागात झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.सध्याच्या परिस्थितीत जे फुले पावसात वाचवले आहेत त्यांनाही बाजारात योग्य भाव मिळतो की नाही असे गुंडेगाव येथील फुल शेतकरी यांचे म्हणणे होते
नवरात्रत्सव हा झेंडूच्या फुलांचा सण म्हणून ओळखला जातो पण यंदा परतीच्या पावसाने आणि भाव नसल्याने झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी पाहायला मिळत होते.गेल्या काही दिवसांपूर्वी अहिल्या नगर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झेंडूच्या फुलांना भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. दरवर्षी ज्या झेंडूच्या क्रेटला ५०० रुपये भाव मिळत होता तो यंदा केवळ ५० ते ८० रुपयांना विकावा लागत होता.
नगर तालुक्यातील गुंडेगाव,अकोळनेर,चास,कामरगाव, सारोळा येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात फुल शेती आहे.मात्र परतीच्या पावसामुळे अनेक भागात झेंडूच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असुन जी फुले शिल्लक राहिली आहेत त्यांना प्रति किलो १०० ते १५० रुपये दर मिळाला आहे.यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे.

सणासुदीच्या काळात सर्वत्र आनंदाचे वातावरण असले तरी परतीच्या पावसाने सर्व काही उद्वस्त केले आहे.झेंडू उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत मात्र हताशेचे अश्रू दिसत आहेत. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी वर्ग मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.एकरी सुमारे ५० ते ६० हजार रुपये खर्च करून आम्ही झेंडूची लागवड केली.परतीच्या पावसाने सर्व काही उद्ध्वस्त केले.परंतु राहिलेल्या फुलांना बाजारात भाव चांगला मिळाला असला तरी उत्पन्न कमी असल्याने आर्थिक फायदा कमी झाला आहे.

विकास शिर्के – फुल उत्पादक शेतकरी,गुंडेगाव.

. . .

यंदा आसमानी संकटामुळे फुलशेतीचे मोठे नुकसान झाले आहे.फुलाचा भाव चांगला असुन फुल शेतीतून चांगले आर्थिक उत्पन्न मिळाले असले तरी अतिवृष्टीमुळे खूपच नुकसान झाले आहे. एक एकर झेंडूची लागवड केली होती. साधारणपणे एकरी ५० हजार रुपये खर्च झाला आहे.आहे त्या स्थितीत फुल शेती जगविणे गरजेचे आहे येणाऱ्या दिवाळी उत्सवात तरी आर्थिक फायदा होईल अशी अपेक्षा आहे.

गौतम कार्ले -फुल उत्पादक, कोरेगाव चिखली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे