Breaking
ब्रेकिंग

सकारात्मक विचारानेच यश मिळेल – – अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे

0 8 6 5 1 4

सकारात्मक विचारानेच यश मिळेल – – अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे

राहुरी तालुका जावेद शेख

सध्या कृषी शिक्षणाकडे मुलांचा ओढा वाढला आहे. कृषी शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मानसशास्त्राचा अभ्यास करणे गरजेचे आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविताना नीतिशास्त्र व मानव संसाधने हे विषय खूप महत्त्वाचे आहेत. आपले करिअर यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी सदैव सकारात्मक विचार केला पाहिजे. जसा तुम्ही विचार कराल तशी तुम्हाला प्रचीती येईल. सकारात्मक विचारानेच यश मिळेल असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. साताप्पा खरबडे यांनी केले.
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, राहुरी येथील रोटरी क्लब व सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने यशाचे मानसशास्त्र या विषयावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. साताप्पा खरबडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक येथील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ व माजी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सिताराम कोल्हे उपस्थित होते. याप्रसंगी कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सचिन नलावडे, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. विक्रम कड, राहुरी रोटरी क्लबचे सचिव डॉ. जयंत कुलकर्णी, रोटरी क्लबचे अध्यक्ष इंजि. अविनाश साबरे, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. अरुण तुपविहीरे व सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहेब खेत्री उपस्थित होते.
यावेळी डॉ. सीताराम कोल्हे मार्गदर्शन करतांना म्हणाले की 100 व्यक्तींपैकी 84 व्यक्ती आपले ध्येय ठरवत नाहीत, 13 व्यक्ती फक्त मनामध्ये ध्येय ठरवतात तर तीन व्यक्ती पेन व वहीच्या सहाय्याने ध्येय ठरवतात, निश्चित करतात व जीवनात यश मिळवतात. जगातील फक्त दोन टक्के व्यक्ती अशा आहेत की ज्यांना आपली क्षमता माहीत असते. तुम्हाला तुमच्या असामान्यत्वाची जाणीव व्हायला हवी. यासाठी स्वतःला सर्वश्रेष्ठ समजा, उच्च ध्येय ठेवा व कितीही मोठी संकटे आली तरीही तुम्ही यशस्वी होणारच याची खात्री बाळगा. हे ब्रह्मांड तुम्हाला बक्षीस किंवा शिक्षा देत नाही तर ते तुम्हाला प्रतिसादच देते. तुम्ही जसं ठरवाल, जसे वागाल, जे मागाल तेच तुम्हाला या ब्रह्मांडाकडून मिळेल. जीवनात दोन रस्ते आहेत. एक आहे सोपा, दुसरा आहे यशस्वी होण्याचा अवघड रस्ता. सोप्या रस्त्याने गेले तर यश मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवा. डॉ. कोल्हे यांनी पावर पॉइंटद्वारे सादरीकरण करून विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधला.
डॉ. सचिन नलावडे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी यशाचा मार्ग दाखविणे आवश्यक आहे. यशस्वी होण्यासाठी प्रयत्न सगळेच करतात परंतु मार्गदर्शक बनून जेव्हा शिक्षक विद्यार्थ्यांना घडवतात त्यावेळी मिळणारे यश हे अधिक आनंद देणारे असते. तुमच्या शिक्षकांनी जे शिकवलं त्यामुळे तुम्ही यशस्वी झालात तर तुम्ही या समाजाला परत काहीतरी द्यायचे आहे हे लक्षात ठेवा. अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे विद्यार्थ्यांच्या जडणघडणीसाठी आवश्यक असून यातून नक्कीच विद्यार्थी घडतील अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इंजि. अविनाश साबरे यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक श्री. अरुण तुपविहिरे, श्री. सुनील लोंढे, सौ. जयश्री इंगळे तसेच महाराष्ट्र शासनाचे आयडॉल टिचर म्हणुन जिल्हास्तरीय निवड झालेले शिक्षक श्री. विलास देशमुख व श्री. संजय लाटे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी नीट परिक्षेतील यशाबद्दल व मुंबई येथील वैद्यकीय महाविद्यालयात मिळालेल्या प्रवेशाबद्दल कु. समीधा साकुरे या विद्यार्थीनीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी श्री. सुनील लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हलीम शेख यांनी तर आभार डॉ. जयंत कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी विद्यापीठातील विभाग प्रमुख, प्राध्यापक, सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे