निर्मलनगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
निर्मलनगर येथे ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
एस डब्ल्यु न्यूज / वृत्तसेवा
नगर : नगर येथील सावेडी उपनगरात प्रभाग क्र.२ निर्मलनगर येथे मा .नगरसेवक निखिलजी वारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करून ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला .
मा .नगरसेवक निखिलजी वारे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. राष्ट्रगीत घेण्यात आले . राष्ट्रध्वजास उपस्थितांकडून मानवंदना देण्यात आली .
अनेक शुर वीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन भारत देश स्वतंत्र केला आहे आणि म्हणूनच आपण आज ७६ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाने साजरा करत असल्याचे वारे यांनी सांगितले .
यावेळी सामाजिक कार्यकर्ते अजय हिवाळे, अभिषेक खामकर, सागर गवळी यांनी देशभक्तीपर भाषण करून प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देऊन सामाजिक संदेश दिला .
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मुलांना व परिसरातील नागरिकांना बिस्कीट पुडे आणि मिठाईचे वाटप करण्यात आले . विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले .यावेळी कार्यक्रमाला संभाजी गवळी, इरफान शेख , ज्ञानदेव काळे, हिवाळे अंकल,चंद्रकांत वायकर, सामाजिक कार्यकर्ते सागर गवळी, युवा नेतृत्व राहुल सांगळे , जावेद इनामदार, साजिद इनामदार , सचिन अकोलकर, दिलीप ठाकूर , अभिषेक खामकर तसेच मेरी खंडागळे ,रंजना काळे , पुष्पा वायकर ,वर्षा गवळी आदी महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .