डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!*

डॉ. सुजय विखे पाटील यांच्या शुभहस्ते स्वस्तिक हॉस्पिटल व यशोधन मेडिकलचे अस्तगाव येथे उद्घाटन..!
प्रतिनिधी : राहूल फुंदे
अस्तगाव : दि.२५ मे रोजी डॉ.आशिष मोकळ यांच्या स्वस्तिक हॉस्पिटल व प्रसाद मोकळ यांच्या यशोधन मेडिकल उद्घाटन डॉ. सुजय दादा विखे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी डॉक्टर सुजय दादा विखे यांनी आरोग्य सेवा म्हणजे व्यक्ती आणि समुदायांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी आवश्यक असलेल्या सेवा आणि सुविधा पुरवणे होय.त्यात सामाजिक कल्याणासाठी आवश्यक असलेल्या सेवा पुरवण्याचे काम मी करतच आहे, व निरंतर करीत राहणार आहे. तर आरोग्याच्या सेवां पुरवण्याचे काम डॉ.आशिष मोकळ यांनी करावं असे मत व्यक्त केले.
या उद्घाटन प्रसंगी डॉ. सुजय विखे पाटील यांनी निळवंडे पाणी प्रश्न सोडवून संपूर्ण परिसरात पाणी देऊन सामाजिक कार्य करण्याचा जो ध्यास घेतला होता तो कोणत्याही पदावर असो किंवा नसो याचा विचार न करता आपण सदोतीत आपल्या परिसरातील शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी सातत्याने पाठपुरावा करून संपूर्ण परिसर जलमय केल्याने आज आनंद होत असल्याचे सांगितले.
डॉ.आशिष मोकळ यांनी आपले वैद्यकिय शिक्षण नाशिक येथे तर एम.डी चे शिक्षण पुणे येथे पूर्ण केले आहे.यात त्यांनी नाशिक व पुणे येथे वैद्यकीय सेवेचा प्रदीर्घ अनुभव घेतलेला आहे.अस्तगाव परिसरातील गरीब गरजू व सर्वसामान्य कुटुंबातील लोकांची आरोग्याची सेवा करण्याचा मानस असल्याचं डॉ.आशिष मोकळ यांनी सांगितले.
या उद्घाटन प्रसंगी अनेक सामाजिक ,राजकीय ,शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यात अस्तगाव येथील सोसायटी सर्व पदाधिकारी व सदस्य ही तसेच ग्रामपंचायत अस्तगाव गावचे. सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य तसेच तलाठी व पोलीस पाटील चोळकेवाडी व अस्तगाव. ग्रामविकास अधिकारी साहेब.इ.परिसरातील नागरिक व महीलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती,