श्री महालक्ष्मी सजावटीत सोनवणे परिवाराने साकारली जेजुरीगडाची प्रतिकृती
सजावट पहाण्यास महिलांची प्रचंड गर्दी

श्री महालक्ष्मी सजावटीत सोनवणे परिवाराने साकारली जेजुरीगडाची प्रतिकृती
सजावट पहाण्यास महिलांची प्रचंड गर्दी
प्रतिनिधी : संवेद वायकर
अहिल्यानगर : सावेडी उपनगरातील वाणीनगर परिसरातील सुखसागर सोसायटी येथील रहिवासी पोस्टमन श्री.उमेश ज्ञानदेव सोनवणे व त्यांची पत्नी सौ. अश्विनी सोनवणे यांनी गौरी गणपतीची अत्यंत आकर्षक सजावट केली असून जेजुरीगडाची अप्रतिम प्रतिकृती साकारली आहे .
गणरायाची मुर्तीही खंडेरायाच्या आकर्षक स्वरूपात आहे . हा देखावा पाहण्यास महिलांची प्रचंड गर्दी दिसून आली .
(श्री व सौ . सोनवणे )
साधारण एक महिना अगोदर पासुन देखाव्याची तयारी करत असून मागील १० वर्षापासून गौरी गणपतीची सजावट करत असल्याचे श्री व सौ सोनवणे यांनी सांगितले . उपस्थित महिलांनीही सोनवणे यांचेकडील मनमोहक आकर्षक गौरी गणपती देखावा पाहण्यास दरवर्षी आवर्जून येत असल्याचे सांगितले . या देखाव्यासाठी सौ.अनुपमा धाडगे ,यशराज आणि पायल गोपालघरे यांचे सहकार्य लाभते. विशेषतः महिलांसाठी गौरीगणपती हा वर्षभरातील हवाहवासा असणारा सण आहे .
(श्री व सौ . सोनवणे )



