Breaking
ब्रेकिंग

शिक्षक भारतीच्या वतीने वावळे यांचा सत्कार ;  श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी पदोन्नती

0 7 6 9 4 3

शिक्षक भारतीच्या वतीने वावळे यांचा सत्कार ;  श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदी पदोन्नती

राहुरी तालुका जावेद शेख

ह.भ.प.सावित्राआई विद्यामंदिर विठे येथील विद्यार्थी प्रिय व उपक्रमशील शिक्षक रावसाहेब वावळे यांची नुकतीच श्री संत ज्ञानेश्वर विद्यालय ढोकरी ता. अकोले येथे पदोन्नतीने मुख्याध्यापक पदी नियुक्ती झाली व संजय आवारी यांची शिक्षकेतर कर्मचारी संवर्गातून शिक्षकपदी पदोन्नती झाल्याने शिक्षक भारती संघटना अकोले यांच्या वतीने दोघांचाही सन्मान करण्यात आला शिक्षक म्हणून वावळे यांनी अतिशय तळमळीने काम केले व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन आदिवासी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे उत्कृष्ट कार्य रावसाहेब वावळे यांचे आहे. त्यामुळे शिक्षक भारती संघटनेचे पुणे विभाग कार्याध्यक्ष महेश पाडेकर, अहिल्यानगर जिल्हा संघटक चंद्रशेखर हासे, उच्चमाध्यमिक विभागाचे तालुकाध्यक्ष संपत वाळके, माध्यमिक विभाग तालुकाध्यक्ष संजय पवार, मुख्याध्यापक बाबाजी वैद्य, माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक किशोर धुमाळ, प्रवीण मालुंजकर,अमोल तळेकर, नरेश खाडगीर, विनोद तारू, सचिन लगड, बाळासाहेब बंगाळ, शरद कडलग, कार्याध्यक्ष गणपत धुमाळ, मार्गदर्शक विजय पांडे,दिलीप धुमाळ, बांडे सर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे