Breaking
ब्रेकिंग

केंद्रप्रमुखांनी वस्तीशाळा विद्यार्थ्यांना केले साहित्य व खाऊचे वाटप..

0 8 6 6 9 3

केंद्रप्रमुखांनी वस्तीशाळा विद्यार्थ्यांना केले साहित्य व खाऊचे वाटप..

वाळकी /  प्रतिनिधी :- दादासाहेब आगळे

नगर तालुक्यातील गुंडेगाव शिवारात असलेल्या पाऊतकावस्ती या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना मांडवगण (ता श्रीगोंदा) केंद्राचे केंद्रप्रमुख दत्तात्रय कडूस यांनी शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले.
दत्तात्रय कडूस हे श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण केंद्राचे केंद्रप्रमुख म्हणून कामकाज पाहत असून कोळगाव केंद्राचा अतिरिक्त पदभार त्यांच्याकडे आहे. शाळा तपासणीनिमित्ताने दत्तात्रय कडूस हे मांडवगण ते कोळगाव हा प्रवास गुंडेगाव (ता. नगर) मार्गे करत असतात. सदर प्रवासादरम्यान गुंडेगावमधील रस्त्यालगतची पाऊतकावस्ती शाळा त्यांच्या निदर्शनास आली. श्रीमती मनिषा भालसिंग या एकमेव शिक्षिका येथे कार्यरत आहेत. एक पद रिक्त आहे. शाळेतील बहुतांश मुले आदिवासी पारधी समाजातील आहेत. शाळेत मुलांची उपस्थिती नियमित असते. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ताही चांगली असून स्वच्छ व सुंदर परिसर आहे.
या शाळेत कार्यरत शिक्षिका श्रीमती मनिषा भालसिंग यांची धडपड पाहून समाजमन जागृत होऊन वंचीत घटकांतील मुलांसाठी आपणही काहीतरी हातभार लावावा या भावनेतून केंद्रप्रमुख दत्तात्रय कडूस यांनी विद्यार्थांसाठी नुकतेच स्वखर्चातून शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले. बालकांना शुभेच्छा व शिक्षकांना पुढील कार्यासाठी पाठबळ दिले. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल गुंडेगाव ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 6 9 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे