बाप की कसाई? नांदरच्या निर्दयी बापाने माणुसकीच संपवली


बाप की कसाई? नांदरच्या निर्दयी बापाने माणुसकीच संपवली!
=================*
बाप म्हणजे काय असतो? बाप म्हणजे मुलांसाठी छत्र, मुलांसाठी आधार, मुलांसाठी संपूर्ण जग. मुलं पडली तर उचलणारा, मुलं रडली तर हसवणारा, मुलांना भूक लागली तर स्वतः उपाशी राहून खाऊ घालणारा म्हणजे बाप.
पण पैठण तालुक्यातील नांदर येथील त्या बापाने या पवित्र नात्याला काळिमा फासला!
ज्या हाताने मुलांना जेवू घालायचं, त्याच हाताने त्याने दोन निरागस चिमुकल्यांना कालव्यात ढकललं. चॉकलेट आणि वडापावचं आमिष दाखवलं. मुलं आनंदाने गेली, बापासोबत फिरायला मिळणार म्हणून खुश झाली. पण त्यांना माहीत नव्हतं, बापच त्यांचा काळ बनून आलाय.
विचार करा, त्या क्षणी त्या चिमुकल्यांनी काय विचार केला असेल? “बाबा, मला वाचवा, बाबा मला हात द्या” असंच म्हटलं असेल ना? पण त्या निर्दयी बापाचं काळीज जराही पाझरलं नाही.
*हा बाप होता की कसाई?*
जो बाप मुलांच्या भविष्यासाठी रात्रंदिवस कष्ट करतो, तो खरा बाप. जो बाप मुलांच्या एका अश्रूसाठी जगाशी भांडतो, तो खरा बाप. पण जो बाप स्वतःच्या रागासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या भांडणासाठी पोटच्या मुलांचा बळी देतो, तो बाप असूच शकत नाही!
. अशा बापाला बाप म्हणणं, हाच बाप या शब्दाचा अपमान आहे.
आज नांदर गावातील प्रत्येक बापाच्या डोळ्यात अश्रू आहेत. कारण या एका निर्दयी माणसामुळे आज सगळ्या बापांवर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय. गावातील आई तर रोज त्या कालव्याकडे बघून रडते, माझी मुलं परत येतील का?
या घटनेनंतर एकच मागणी आहे – या नराधमाला कडकात कडक शिक्षा झालीच पाहिजे. याला फाशीच झाली पाहिजे. कारण जर याला सोडलं, तर उद्या अजून एक नांदर घडेल, अजून दोन चिमुकल्यांचा बळी जाईल.
बापाने मुलांना मारायचं नसतं, बापाने मुलांसाठी मरायचं असतं. हे ज्याला कळलं नाही, तो माणूसच नाही.
*त्या दोन निष्पाप चिमुकल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.*
*प्रा ज्ञानेश्वर कृष्णाजी बनसोडे सर*
*पोलीस क्राईम न्यूज ब्युरो चीफ*
*मो ९६०४७९७३१६*




