न्यायालयीन थकीत वेतनासाठी शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन उत्साहात पार एक महिन्यात थकीत वेतन देण्याचे आश्वासन
न्यायालयीन थकीत वेतनासाठी शिक्षक भारतीचे धरणे आंदोलन उत्साहात पार
एक महिन्यात थकीत वेतन देण्याचे आश्वासन
राहुरी तालुका जावेद शेख
शिक्षकांना न्यायालयीन आदेशानुसार थकित वेतन देण्यात होत असलेल्या विलंबाविरोधात शिक्षक भारती संघटनेच्या वतीने आज पुणे येथे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातील शिक्षक भारती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनात घोषणाबाजी करत शिक्षकांनी शासनाचे लक्ष वेधले व “न्यायालयीन थकीत वेतन द्या, शिक्षकांना न्याय द्या!” असा जोरदार नारा दिला.
या प्रसंगी विना अनुदानित कृती समितीचे राज्याध्यक्ष श्री. जयवंत भाबड, पुणे विभाग कार्याध्यक्ष प्रा. महेश पाडेकर, रूपालीताई कुरुमकर (अहिल्यानगर जिल्हा अध्यक्षा), रामराव काळे (अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष), शाहू बाबर (सोलापूर जिल्हाध्यक्ष), सतीश ठाकरे (धुळे जिल्हा शिक्षक नेते), राजीव शिरसाठ (पुणे जिल्हा कार्याध्यक्ष) तसेच विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी, महिला पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलनादरम्यान प्रशासन अधिकारी श्री. अनंत दाणी यांनी शिक्षक प्रतिनिधींसोबत चर्चा करून “तुमचे थकित बिल एक महिन्याच्या आत मंजूर केले जाईल” असे आश्वासन दिले. तसेच वेतन अधीक्षक, शिक्षणाधिकारी आणि उपसंचालक कार्यालयांनी बिलांच्या हार्ड कॉपी तातडीने पाठवली नाही तर संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर कार्यवाही केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.
या आंदोलनाचे नेतृत्व व प्रा. महेश पाडेकर (पुणे विभाग कार्याध्यक्ष,)व प्रा. रामराव काळे (जिल्हाध्यक्ष, अहमदनगर)यांनी केले. आंदोलनात राज्यातील अनेक शिक्षक भारतीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि शिक्षक सहभागी झाले.
शिक्षक भारती संघटनेने शासनाकडे ठाम मागणी केली की, न्यायालयीन आदेशानुसार सर्व शिक्षकांचे थकित वेतन व CHB शिक्षकांचे वेतन दिवाळीपूर्वी अदा करण्यात यावे, अन्यथा पुढील तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही या वेळी देण्यात आला.
या वेळीजिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, संघटक चंद्रशेखर हासे,सहसचिव राहुल कानवडे ,तालुका अध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, साई थोरात,संपत वाळके,नानासाहेब खराडे, रूपालीताई बोरुडे,कल्पना चौधरी, मफीज इनामदार,दीपक फापाळे,गणपत धुमाळ,विजय पांडे, अमोल तळेकर,संतोष नवले,बाबासाहेब तांबे,अकील फकीर,बाबाजी लाळगे,वैभव चोथे,प्रवीण मालुंजकर,श्याम जगताप,भोजने आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .


