जि.प.प्राथमिक शाळा खेडीभोकरी येथील मुख्याध्यापक यांचा तालुकास्तरीय व्हीडीओ स्पर्धेचे पारीतोषीक प्रदान

जि.प.प्राथमिक शाळा खेडीभोकरी येथील मुख्याध्यापक यांचा तालुकास्तरीय व्हीडीओ स्पर्धेचे पारीतोषीक प्रदान
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
चोपडा :- नुकताच महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रिडा विभाग जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था जळगाव मार्फत घेतल्या गेलेल्या दर्जेदार शैक्षणिक व्हिडीओ निर्मिती स्पर्धेत जिल्हा परिषद *खेडीभोकरी* शाळेचे मुख्याध्यापक *भास्कर शंकरराव पाटील* यांचा *छोटुशी भाजीवाली छान छान छान* या भाषा विषय गटात *तालुकास्तरावर द्वितीय क्रमांक* पटकावला यासाठी त्यांना दोन हजार रुपये रोख,ट्राफी,प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन चोपडा तालुक्याचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्याचे गटविकास अधिकारी अनिल विसावे ,गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, पंकज विद्यालयाचे संचालक पंकज बोरोले,केंद्रप्रमुख वैशाली पाटील, देवेंद्र पाटील, नरेंद्र सोनवणे, दिपक पाटील यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
यावेळी भास्कर पाटील यांचे शालेय व्यवस्थापन समीती खेडीभोकरी अध्यक्ष प्रविण पाटील, घनश्याम सोनवणे, सुनील पाटील, उपाध्यक्ष सोपान कोळी, उप सरपंच रणछोड पाटील,पोलीस पाटील कैलास पाटील, प्रदिप पाटील घनश्याम सर सर्व व्येवस्थापन समिती सदस्य, ,रमेश शिरसाठ, रोहीदास कोळी,विक्रम बोरसे,हर्षल बागुले,परीक्षीत चव्हाण तालुक्यातील व गोरगावले केंद्रातील सर्व शिक्षक समन्वयक प्रंशात सोनवणे, मिलिंद पाटील, सर्व विषय शिक्षक यांनी अभिनंदन केले .