Breaking
ब्रेकिंग

राहुरी पोलीस स्टेशन तर्फे आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त धुमाळ पाटील कॉलेज राहुरी तसेच महात्मा फुले विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे एकता दौड चे आयोजन

0 7 6 9 3 2

राहुरी पोलीस स्टेशन तर्फे आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त धुमाळ पाटील कॉलेज राहुरी तसेच महात्मा फुले विद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे एकता दौड चे आयोजन

राहुरी तालुका जावेद शेख

राष्ट्राची एकता एकात्मता अबाधित राहण्याच्या दृष्टिकोनातून ऑपरेशन मुस्कान भाग 2 चा शुभारंभ करण्यात आला .त्यावेळी दोन्ही शाळेतील व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यार्थी दहशत होणाऱ्या गुन्ह्यांबाबत अवगत करून असा कुठलाही गुन्हा विद्यार्थ्यांच्या बाबतीत होणार नाही याबाबत माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घाडगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब उपविभागीय पोलिस अधिकारी श्री जयदत्त भाऊसाहेब यांच्या मार्गदर्शनात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते .

*🚔 ऑपरेशन मुस्कान – भाग 1*

राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत मागील *नऊ वर्षांतील* अपहरण झालेल्या *एकूण 91* मुलींचा शोध दिनांक 1 फेब्रुवारी 2024 पासून घेण्यात *यश आले आहे* . अजूनही सहा अल्पवयीन मुलींचा कसोशीने शोध सुरू आहे.
या मोहिमेद्वारे राहुरी पोलीस स्टेशनकडून *अपहरणविरोधी कार्यात नवा मैलाचा दगड* निर्माण करण्यात आला आहे.

*🎯 ऑपरेशन मुस्कान – भाग 2*

आता, दिनांक 1 नोव्हेंबर 2025 पासून, राहुरी पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील कोणत्याही मुलीचे *अपहरण होऊ नये, यासाठी जागरूकता* मोहीम सुरू करण्यात येत आहे.

या मोहिमेअंतर्गत *शालेय स्तर (इ.8 वी ते 10 वी),* *महाविद्यालयीन स्तर (इ.11वी ते 12 वी) व पदवीधर स्तर* विद्यार्थ्यांमध्ये
*निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा आणि भित्तीपत्रक (चित्रकला)* स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत.

सदर तालुकास्तरीय स्पर्धेतील *प्रत्येक गटातील व प्रत्येक स्पर्धा स्वरूपातील* *प्रथम 3 विजेत्यांना* दि. 9 नोव्हेंबर 2025 रोजी राहुरी पोलीस स्टेशनच्या संकल्पनेतून, *राहुरी तालुका कलाकार मंच व* *केअर संस्था* , पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “ *शब्दसुर* ” या विशेष कार्यक्रमात पारितोषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक *सहभागी विद्यार्थ्यास प्रशस्तीपत्रक* देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास *स्नेहालय* संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. *श्री. गिरीश कुलकर्णी* तसेच *मा. पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे साहेब* हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

*✍️ स्पर्धेचा विषय*

*“खेळ सोशल मीडियाचा… प्रश्न कुटुंब व्यवस्थेचा”*

या विषयावर विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडत समाजात जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन राहुरी पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येत आहे.

समाजातील प्रत्येक *कुटुंब सुरक्षित, सशक्त आणि सजग* व्हावे हा ” *ऑपरेशन मुस्कान”* चा खरा हेतू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 3 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे