Breaking
ब्रेकिंग

छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी अल्लाउद्दीन शेख तर उपाध्यक्षपदी विजय बिडकर व शुभम कोंगे

0 8 9 6 7 5

छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाची नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी अल्लाउद्दीन शेख तर उपाध्यक्षपदी विजय बिडकर व शुभम कोंगे

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. २१/ छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ गणेशोत्सव २०२६ समितीच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच जाहीर करण्यात आली. यावेळी मंडळाचे मार्गदर्शक सुनिल बापु सावंत अॕड. राहुल भाऊ सावंत, संजय आण्णा सावंत व मंडाळाचे जेष्ठ युवा कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत हि निवड करण्यात आली.

नूतन कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी अल्लाउद्दीन शेख तर उपाध्यक्षपदी जय बिडकर व शुभम कोंगे यांची निवड करण्यात आली‌. तसेच सचिवपदी भैय्या सूर्यवंशी, सहसचिवपदी सागर नलवडे, खजिनदार पदी भुषण सुरवसे, सह खजिनदार सागर वीर मिरवणूक प्रमुखपदी जयवंत सोनू बनकर, उपमिरवणुक प्रमुख बंटी शिंदे व कार्याध्यक्षपदी अवी सुरवसे यांची एकमताने निवड करण्यात आली.

निवडीनंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. संदीप दुधाळ यांनी आभार मानले. यावेळी मंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे