Breaking
ब्रेकिंग

महेश पाडेकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान*

गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने राहुरी कृषी विद्यापीठ येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

0 3 9 0 2 7

महेश पाडेकर यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने राहुरी कृषी विद्यापीठ येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

राहुरी तालुका जावेद शेख

अगस्ती कला, वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय अकोले येथील मानसशास्त्र विषयाचे शिक्षक महेश पाडेकर यांना नामांकित गरुड फाउंडेशन महाराष्ट्र व युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र यांच्या वतीने महाराष्ट्रातील वैद्यकीय, प्रशासकीय,सहकार, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, कृषी, पत्रकारिता,आरोग्य, पर्यावरण, क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय व समाज हिताचे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना महाराष्ट्रातील नामांकित पुरस्कारांपैकी समजला जाणारा पुरस्कार दिला जातो. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे अण्णासाहेब शिंदे सभागृह अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, माजी मंत्री प्राजक तनपुरे रावसाहेब खेवरे, पोलीस आयुक्त संदीप भांड, तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, रमेश खेमनर, पत्रकार जावेद शेख यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आला महेश पाडेकर यांची आदिवासी भागात शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात भरीव योगदान आहे विद्यार्थ्यांना नवोपक्रमाच्या साह्याने अध्ययन निष्पत्ती देण्याचे पवित्र काम पाडेकर यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक समाज हिताचे उपक्रम यशस्वी राबवले आदिवासी क्षेत्रातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न व विद्यार्थी ही डोळ्यासमोर ठेवून महेश पाडेकर यांनी तळमळीने काम केले यामुळे त्यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी विश्वस्त वैभवराव पिचड, संस्थेचे अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकर देशमुख, सर्व विश्वस्त, कार्यकारणी सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य भास्कर शेळके, उपप्राचार्य चांगदेव डोंगरे, पर्यवेक्षक विवेककुमार वाकचौरे, प्रबंधक सिताराम बगाड, संचालक किशोर धुमाळ आदी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले तसेच शिक्षक भारती संघटना पुणे विभाग व निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य आदी संघटना पदाधिकारी, सदस्य यांनी महेश पाडेकर यांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे