अपहरित मुलीचा 4 दिवसात शोध ; पालकांच्या ताब्यात
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत १११ अल्पवयीन मुलींचा शोध
अपहरित मुलीचा 4 दिवसात शोध ; पालकांच्या ताब्यात
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत १११ अल्पवयीन मुलींचा शोध
राहुरी तालुका / जावेद शेख
राहुरी तालुक्यातील फिर्यादी यांच्या फिर्यादीनुसार फिर्यादी यांची अल्पवयीन १६ वर्षीय मुलगी हिला कोणीतरी अज्ञात इसमाने पळवून नेल्याबाबत तक्रार दिल्याने राहुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 599/ 2026 बी एन एस कलम 137(2) प्रमाणे दिनांक 27/05/2026 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यातील अपहरित मुलीबाबत गोपनीय माहिती मिळाल्याने मुलीचा तांत्रिक व भौतिक पुराव्याच्या अनुषंगाने शोध घेतला असता सदर मुलगी मिळून आल्याने तिला पोलीस स्टेशन येथे आणून विचारपूस करून पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक सो मुम्मका सुदर्शन सो, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे सो, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर सो तसेच माननीय पोलीस निरीक्षक सो ठेंगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र कांबळे, पोलीस नाईक कुदळे,चालक पोलीस कॉन्स्टेबल/ पठाण,महोम/ पवार यांनी केला असून तापसास तांत्रिक मदत मोबाइल सेल श्रीरामपूर येथील पोहवा/दरेकर, पोहवा/धनाड यांनी केलेली आहे.



