महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत दत्तकला आयडियल स्कूल अ़ॅन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं १ चे घवघवीत यश

महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परिक्षेत दत्तकला आयडियल स्कूल अ़ॅन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं १ चे घवघवीत यश
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २७/ महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षेत दत्तकला आयडियल स्कूल अ़ॅन्ड ज्यूनिअर कॉलेज केत्तुर नं. १ चे घवघवीत यश संपादन केले आहे. सध्याच्या स्पर्धेच्या युगात शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षेची आवड निर्माण व्हावी, लहानपणापासूनच विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढावा म्हणून मंथन, स्कॉलरशिप, नवोदय, गुरुकुल, गणित मंडळाच्या विविध स्पर्धा परिक्षा अशा विविध प्रकारच्या स्पर्धा परिक्षांना विद्यार्थ्यांना बसवले जाते. शालेय अभ्यासक्रमाबरोबर विविध स्पर्धा परिक्षेचा अभ्यासक्रम शिकवला जातो. सरावासाठी सराव परिक्षा घेतल्या जातात. शाळेचे मुख्याध्यापक श्री. विजय मारकड सर, परिक्षा विभाग प्रमुख बाबर सर, राऊत सर, सर्व शिक्षक यांचे मुलांना मार्गदर्शन लाभले. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत रविवार दिनांक 9 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता 5 वी मधून सात विद्यार्थी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये
*1)अथर्व गुंड (68.66%)*
*2)स्वरा पाटील (62.41%) ,*
*3)वेदांत बाबर(62%)*
*4)यश येडे (54%),*
*5)अंकिता निकत (51.33%)* ,
*6)नेहा नगरे(47.65%)*
*7)शिवम पवार(46.30%)*
तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षा इयत्ता 8वी मधून दोन विद्यार्थी
*1)संकेत पवार (53.37%) ,*
*2)दिया चौधरी (50%)*
हे सर्व विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेत पात्र ठरले आहेत. शिष्यवृत्ती परिक्षेत घेण्यात येणाऱ्या दोन्ही पेपर मध्ये 40% पेक्षा जास्त गुण मिळवणे आवश्यक असते. या सर्व विद्यार्थ्यांनी सर्व निकष पार करून अतिशय उत्कृष्ट यश संपादन केले आहे त्याबद्दल त्यांचे सर्व पालक वर्गातून अभिनंदन केले जात आहे. तसेच येणाऱ्या कालखंडामध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये पात्र व्हावेत अशा शिक्षक व शाळेला शुभेच्छा दिल्या.
या यशासाठी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. रामदास झोळ सर,यांनी स्कूलचे प्राचार्य श्री. विजय मारकड सर, प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.