Breaking
ब्रेकिंग

रिपब्लिकन सेनेचे ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश

0 3 9 0 2 5

रिपब्लिकन सेनेचे ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर यांचा रिपब्लिकन पक्षात प्रवेश

संगमनेर प्रतिनिधी / नितीनचंद्र भालेराव

रिपब्लिकन सेनेचे ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर यांनी रिपब्लिकन सेनेचा राजीनामा देऊन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले )पक्षात प्रवेश केला.ज्येष्ठ नेते काकासाहेब खंबाळकर यांचे रिपब्लिकन पक्षात स्वागत करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघात त्यांच्या पक्ष प्रवेशाची माहिती
रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत अधिकृतरित्या देण्यात आली.
मुंबई मराठी पत्रकार संघात रिपब्लिकन पक्षाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर,राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे,मुंबई प्रदेश अध्यक्ष सिध्दार्थ कासारे,रिपब्लिकन पक्षाचे सचिव सुरेश बारशिंगे, विजय सोनवणे,प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष श्रीकांत भालेराव, विवेक पवार,प्रकाश जाधव, सोना कांबळे आदि नेते उपस्थीत होते.

रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचे नेतृत्व आंबेडकरी जनतेला, सर्व बहुजन समाजाला न्याय देणारे नेतृत्व आहे.राष्ट्रीय स्तरावर खऱ्या अर्थाने दलित बहुजनांचे नेतृत्व करणारे एक आदर्श नेते म्हणुन ना.रामदास आठवले आपल्याला सदैव प्रिय आहेत.आपण ना.रामदास आठवले यांच्या पासुन मनाने कधीही दुर गेलो नाही.

ना.रामदास आठवले हे कायम आमचे नेते राहिले आहेत.पक्ष भेदा पलीकडे जाऊन ते सर्व समाजमान्य नेते झाले आहेत. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करण्यासाठी रामदास आठवले कार्य करत आहेत.त्यात ते यशस्वी झाले आहेत.समाजाला सदैव न्याय देण्यासाठी ते कार्यरत असतात.मोठ्या मनाचे नेते असल्यामुळे आपण ना.रामदास आठवले यांच्या नेतृत्वात रिपब्लिकन पक्षात प्रवेश केल्यानंतर काकासाहेब खंबाळकर यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष तथा अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांनी दिली.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे