Breaking
ब्रेकिंग

अन्न व औषध प्रशासन विभागातील लाच प्रकरणाची गंभीर दखल

0 7 6 9 4 3

अन्न व औषध प्रशासन विभागातील लाच प्रकरणाची गंभीर दखल

नगर /  प्रतिनिधी :  शिवा म्हस्के

दि. १५ : अन्न व औषध प्रशासन विभागामधील लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी लाच घेताना पकडलेल्या लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. संबंधित लिपिकाची केवळ चौकशीच नव्हे, तर त्यांची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

विभागातील दक्षता पथकाला या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. लिपिक राजू ढेरिंगे याच्याविरुद्ध वस्तुनिष्ठ आणि सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

राजू ढेरिंगे हे मूळ अन्न व नागरी पुरवठा विभाग येथील कर्मचारी असून सध्या अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर कार्यरत होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 7 6 9 4 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे