सिंजटा फाउंडेशन यांच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व म.फु.कृ.वि. यांचे फुले 15012 ऊसाचे प्रात्यिक्षिक
सिंजटा फाउंडेशन यांच्या पाडेगाव ऊस संशोधन केंद्र व म.फु.कृ.वि. यांचे फुले 15012 ऊसाचे प्रात्यिक्षिक
राहुरी वृत्तसेवा / प्रतिनिधी जावेद शेख
सिंजटा फाॅउडेशन यांच्या सहकार्याने तसेच पाडेगाव ऊस संशोधन केंद्र आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ यांनी शिफारस केलेल्या फुले 15012 या ऊसाच्या वाणांचे प्रात्यक्षिक क्षेत्र म्हणून वरवंडी येथील प्रगतिशील शेतकरी श्री भगवान अडसुरे यांच्या क्षेत्राची निवड करण्यात आली फुले 15012 या ऊसाच्या वाणांच्या लागवडीप्रसंगी सिंजटा फाॅउडेशन जिल्हा समन्वयक मा.श्री पवनजी थोरात सर, कृषी अधिकारी गावडे मॅडम,EDF चे राहुरी तालुका प्रमुख पुनम खाडे मॅडम सिंजटा फाॅउडेशन चे राहुरी प्रमुख श्री अक्षय चेडे सर उपस्थित होते
या कार्यक्रमात श्री पवन थोरात सरांनी शेतकऱ्यांना फुले 15012 या ऊसाच्या वाणाची वैशिष्ट्ये व 265 या ऊसाच्या वाण आणि 86065 या ऊसाच्या वाणा पेक्षा 15012 हा वाण कसा चांगला आहे या विषयावर शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तसेच या वाणाची लागवड कशा पध्दतीने करावी किती अंतरावर करायची याचे प्रात्यक्षिक गावडे मॅडम यांनी करून दाखवले व EDF चे कार्य कसें चालते व या क्षेत्राची निवड करण्यामागील उद्देश याविषयी माहिती EDF च्या खाडे मॅडम यांनी दिली तसेच हवामान बदलामुळे शेतीवर काय परिणाम होतात तसेच हवामान बदलानुसार शेतकर्यांनी पिक पद्धती मध्ये काय बदल करावे या विषयी श्री चेडे सरांनी मार्गदर्शन केले तसेच शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन देखील याप्रसंगी करण्यात आले याप्रसंगी वरवंडी व बाभुळगाव येथील शेतकरी श्री आबासाहेब ताकटे, श्री रविंद्र अडसुरे , श्री दादासाहेब अडसुरे, श्री.पाटोळे, वाघमोडे पाटील,श्री मनोज अडसुरे,सौ ललिता अडसुरे श्री संदिप अडसुरे आदि उपस्थित होते.



