*सौ. सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक मध्ये अभियंता दिन उत्साह संपन्न.*
*सौ. सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक मध्ये अभियंता दिन उत्साह संपन्न.*
प्रतिनिधी : धीरज लांडगे
चास, अहिल्यानगर येथील सौ. सुंदरबाई माणिक आडसूळ पॉलिटेक्निक मध्ये अभियंता दिन नुकताच उत्साहात पार पडला. १५ सप्टेंबर हा दिवस प्रघल्भ बुद्धिमत्ता असलेले स्थापत्य अभियंता भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस सर्वत्र अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. अभियंता दिनाच्या निमित्ताने महाविद्यालयांमध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम वर्ष ते तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांनी विज्ञान व तंत्रज्ञान विषयाशी संबंधित उपकरन निर्मिती, भित्तीफलक व पी.पी. टी. सादरीकरण स्पर्धेत सहभाग नोंदवून आपल्या सादरीकरण व कौशल्य गुणांचे दर्शन घडवले.
विद्युत अभियांत्रिकी, स्थापत्य अभियांत्रिकी, यंत्र अभियांत्रिकी संगणक अभियांत्रिकी व इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या विविध शाखातील विविध विषयावर आधारित असलेले उपकरणे प्रेक्षकांचे मने जिंकून घेत होती.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑब्जेक्ट डिटेक्टर सेन्सर, आडसूळ पॉलिटेक्निकच्या भव्य इमारतीची प्रतिकृती, अंधश्रद्धा निर्मूलन प्रयोग, अत्याधुनिक उड्डाणपूलांची संरचना, विद्युत निर्मिती प्रकल्प, चुंबकत्वावर चालणारी रेल्वे अशा अनेक विषयावर तयार केलेली उपकरणे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आडसूळ पॉलिटेक्निकचे प्राचार्य गडाख आर. एस. यांनी सांगितले की भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा भारताच्या विकासामध्ये मोलाचा वाटा असून कृष्णराज सागर, पुण्याच्या खडकवासला धरणाचे स्वयंचलित दरवाजे, वृंदावन गार्डन आदी विविध प्रकल्पांमध्ये मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. विद्यार्थ्यांनी मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा आदर्श ठेवून यशस्वी अभियंता बनावे व कौशल्यपूर्ण बनलेल्या अभियंत्यांनी सामाजिक बांधिलकी राखत देशाच्या विकासात हातभार लावावा. आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे प्राचार्य डॉ. पी. एम. पाटील यांनी आडसूळ पॉलिटेक्निकच्या सर्व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत मौलिक मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
प्रसंगी साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे अध्यक्ष मा. श्री अनिरुद्ध आडसूळ, सचिव डॉ. लीना आडसूळ, डायरेक्टर कृष्णा आडसूळ, खजिनदार परमेश्वर आडसूळ, सदस्य कल्पना आडसूळ व रत्ना आडसूळ, डॉ. पी. एम. पाटील, डॉ. संभाजी पठारे, डॉ. धनंजय लांडगे, डॉ. संदेश वायाळ, डॉ. पंडित प्रदीप, प्रा. रमेश गडाख सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.



