Breaking
ब्रेकिंग

वाडिया पार्क जिमखाना येथे कचऱ्याचे साम्राज्य ; प्रेक्षक गॅलरीत प्रचंड कचरा व दुर्गंधी

0 8 9 6 7 4

वाडिया पार्क जिमखाना येथे कचऱ्याचे साम्राज्य ; प्रेक्षक गॅलरीत प्रचंड कचरा व दुर्गंधी

अहिल्यानगर / प्रतिनिधी

अहिल्यानगर येथील वाडिया पार्क येथे शालेय विभागीय तलवारबाजी स्पर्धा घेण्यात आल्या . परंतु या स्पर्धेपूर्वी जिमखानाची कोणतीही स्वच्छता करण्यात आली नसल्याचे चित्र पहायला मिळाले . पिंपरी – चिंचवड, पुणे , सोलापूर , नगर इत्यादी जिल्हयातून आलेले विद्यार्थी व शिक्षक यांनी याची खंत व्यक्त करून दाखवली .

वाडिया पार्क येथील जिमखाना येथे मोठ्या प्रमाणात कचरा व दुर्गंधी
आढळून आली असून अहिल्यानगर सारख्या ऐतिहासिक शहराच्या स्टेडियमची ही वाईट अवस्था पाहुन बाहेरील शिक्षकांनी आश्चर्य व निराशा व्यक्त केली .या कचऱ्यातच विद्यार्थी जेवायला बसलेले पहायला मिळाले . जिमखान्यांमधील पुरुष व महिला स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची टंचाई आणि कमालीची दुर्गंधी असल्याचे शिक्षकांनी सांगितले .

सामन्यांच्या वेळी किंवा विविध कार्यक्रमांनंतर प्लास्टिक बाटल्या, खाण्याचे वेष्टन आणि इतर कचरा स्टेडियमच्या परिसरात तसाच पडून राहिल्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न गंभीर बनला आहे. या संदर्भात योग्य कारवाई करण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि जिमखाना व्यवस्थापनाकडे नागरिकांकडून वारंवार पाठपुरावा केला जातो .

जिमखाना स्टेडियम परिसरात पसरलेल्या अस्वच्छतेमुळे खेळाडू व नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला . प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे स्टेडियममधील स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली असून, कचऱ्याचे ढीग साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे .दररोज शेकडो खेळाडू आणि नागरिक या ठिकाणी सरावासाठी व फिरण्यासाठी येतात, मात्र स्टेडियमच्या दुरवस्थेमुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

यावेळी काही नागरिक व शिक्षकांनी जिमखाना व्यवस्थापन समितीच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर स्वच्छता करण्यात आली . परंतु स्पर्धा सुरू होण्या अगोदर ही स्वच्छता का केली गेली नाही यावर काही कारवाई होणार का असे नागरिक विचारत आहेत .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे