Breaking
ब्रेकिंग

विजेच्या खांबाला शॉक बसुन चिमुकल्या मुलीचा मृत्यू ; महावितरणच्या विरोधात लोक प्रतिनिधी व नागरिकांचा संताप

0 8 6 5 2 1

विजेच्या खांबाला शॉक बसुन चिमुकल्या मुलीचा मृत्यू ;

महावितरणच्या विरोधात लोक प्रतिनिधी व नागरिकांचा संताप

अहिल्यानगर / प्रतिनिधी

अहिल्यानगर : स्टेशन रोड परिसरात पावसात महावितरणच्या गलथान कारभारामुळे एका साडेतीन वर्षीय चिमुकल्या मुलीचा नाहक बळी गेला आहे . स्टेशन रोडच्या प्रभाग क्र .१५ मधील आनंदनगर येथील प्रीती गांगुर्डे या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा पावसात विजेच्या खांबाला शॉक बसुन मृत्यु झाला . सदर खांबाच्या दुरुस्तीबाबत आनंदनगर येथील रहिवाशांनी अनेकदा निवेदने दिली महावितरणला दुरुस्ती बाबत विनंती केली . परंतु महावितरणचा भोंगळ कारभार पहाता एका चिमुरड्या मुलीचा वीजवाहक खांबाचा शॉक लागून मृत्यु झाला आहे . प्रभागातील नगसेवक दत्ता गाडळकर, नगरसेवक संकेत गवाले, नगरसेविका गीतांजली काळे यांनी घटनेची दखल घेवून महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारत महावितरण कार्यालया समोर ठिय्या आंदोलन केले आहे .

 

अनेक दिवसांपासून महावितरणच्या अधिकाऱ्यांना वारंवार विनवण्या करूनही महावितरणच्या गलथान कारभारामुळे आनंदनगर मधे एका चिमुरडीचा जीव गेला आहे . याची जबाबदारी संबंधीत अधिकारी घेणार का ? याचा सोक्षमोक्ष होईपर्यंत आम्ही महावितरण कार्यालया समोर ठिय्या आंदोलन चालूच ठेवणार आहोत .

दत्ता गाडळकर ( नगरसेवक )

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 2 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे