खाजगी एजंट करताहेत मध्यस्थी ; घर जप्तीस मुदतवाढीसाठी लाच घेताना रंगेहात पकडले

( अ.भा.मे .स.अध्यक्ष : सनीभैय्या खरारे )
खाजगी एजंट करताहेत मध्यस्थी ; घर जप्तीस मुदतवाढीसाठी लाच घेताना रंगेहात पकडले
अखिल भारतीय मेहतर संघटना सातत्याने करत आहे पाठपुरावा
नगर / प्रतिनिधी
भिंगार तलाठी कार्यालयात सी.सी.टीव्ही व्हॉइस रेकॉर्डिंग कॅमेरे बसविण्यात यावे या साठी अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने दिं १३/२/२५ रोजी मा.पालक मंत्री साहेब अहिल्यानगर, मा.जिल्हाधिकारी साहेब अहिल्यानगर, मा.तहसिलदार साहेब अहिल्यानगर व मंडळ अधिकारी भिंगार कार्यालय यांच्या बरोबर वेळोवेळी चर्चा करून निवेदन देण्यात आले होते. संघटनेच्या वतीने संबंधित प्रशासनाला वेळोवेळी निवेदन देऊन याचा पाठपुरावा घेण्यात आला परंतु संबंधित प्रशासना कडून याची कुठलीही दखल घेण्यात आली नाही.याचाच परिणाम पहाता आज अनेक नागरीकांना कार्यालयीन कामासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे .
भिंगार तहसील कार्यालय यांच्याकडून देण्यात आलेल्या एका व्यक्तीच्या घराच्या नोटिसची मुदत वाढवून देण्याच्या बदल्यात मंडळ अधिकाऱ्याच्या नावे तक्रारदारां कडून २० हजाराची लाच घेताना एका खाजगी इसमास मंगळवारी दि .१७ जुन रोजी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले . हा फक्त आताचा गुन्हा नाही तर याच्या अगोदरही या भिंगार तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात असे कीतीतरी गुन्हे घडलेले आहेत आणि अजुनही घडत आहेत .याच्या विरोधात अखिल भारतीय समाज संघटनेने नेहमी पाठपुरावा केला आहे आवाज उठवला आहे . सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे , त्यांची कुठल्याही प्रकारची आर्थिक लूट होता कामा नये अशा या सर्व गोष्टीचा अखिल भारतीय मेहतर समाज संघटनेच्या वतीने वारंवार निवेदने देऊन व सतत पाठपुरावा करून सुद्धा शासनाने कुठलीही दखल घेतली नाही. या बाबत शासनाने पूर्णपणे दिरंगाई दाखवली व लापरवाही दाखवल्यामुळे सामान्य नागरिकांना खूप त्रास होत आहे. आज जर कार्यालयात सी.सी.टीव्ही व्हॉइस रेकॉर्डिंग कॅमेरे असते तर त्या २० हजारांच्या लाचेमुळे जो व्यक्ती सापडला तो व्यक्ती किंवा इतर संबंधित जो कोणी सहभागी अधिकारी कर्मचारी दोषी आहे किंवा नाही याचा खुलासा झाला असता . या मागे आणखी कोणी आहे का ? याचा देखील खुलासा झाला असता व आता मात्र याची सखोल चौकशी व्हावी कारण की अश्या गोष्टी या अगोदरही मोठ्या प्रमाणात घडलेल्या नाकारता येत नाही .
संघटनेचे अध्यक्ष सनी भैया खरारे म्हणाले कि, आमच्या संघटनेच्या वतीने प्रशासनाला विनंती आहे की या प्रकरणावर सखल चौकशी करण्यात यावी. व गुन्हेगारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी . या विषयावर लवकरच संघटनेच्या वतीने संबंधित प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे .
दोषींवर कायवाई करून नागरिकांना दिलासा द्यावा आणि नागरिकांची होणारी आर्थिक लुट थांबवावी .