महामाहीम श्री सी.पी. राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन …… समाजसेवक साहित्यिक नामदेव शेवराबाई ज्ञानदेव भोसले व आदिवाशी पारधी समाजाने शुभेच्छा दिल्या
महामाहीम श्री सी.पी. राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन …… समाजसेवक साहित्यिक नामदेव शेवराबाई ज्ञानदेव भोसले व आदिवाशी पारधी समाजाने शुभेच्छा दिल्या
प्रतिनिधी / पुणे जिल्हा
“महामहीम श्री. सि. पी. राधाकृष्णन यांची भारताचे उपराष्ट्रपती पदी निवड झालीमुळे आदिवासी साठी गौरवाचा क्षण आहे”नवी दिल्ली : भारताचे नवे उपराष्ट्रपती म्हणून महामहीम श्री. सि. पी. राधाकृष्णन यांच्या निवडीबद्दल देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या निमित्ताने शेवराई सामाजिक संस्था, पुणे, आखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण महाराष्ट्रातील आदिवासी पारधी बांधवांतर्फे त्यांना हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा.या प्रसंगी साहित्यिक नामदेव ज्ञानदेव भोसले, (महाराष्ट्र शासन आदिवासी सेवक, अध्यक्ष – आखिल भारतीय आदिम महासंघ महाराष्ट्र राज्य, तसेच अध्यक्ष – शेवराई सामाजिक संस्था, पुणे यांच्याकडून शुभेच्छा आहे तसे “राधाकृष्णन यांची निवड ही देशातील सर्व वंचित, उपेक्षित आणि आदिवासी समाजासाठी प्रेरणादायी आहे. त्यांचे नेतृत्व आदिवासींसाठी नवी दिशा दाखवणारे ठरेल.”
या निवडीमुळे समाजामध्ये उत्साहाचे वातावरण असून आदिवासी समाजाच्या विकासासाठी नव्या संधी खुल्या होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.



