Breaking
ब्रेकिंग

गुंडेगाव येथे आदिशक्ती महिला समितीची स्थापना;दारूबंदी व अवैध धंद्याविरोधात आक्रमक…

0 4 3 3 2 4

गुंडेगाव येथे आदिशक्ती महिला समितीची स्थापना;दारूबंदी व अवैध धंद्याविरोधात आक्रमक…

वाळकी / प्रतिनिधी : दादासाहेब आगळे

अहिल्यानगर येथील गुंडेगावातील महिलांच्या सहभागातून विशेष महिला ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत ‘आदिशक्ती महिला समिती’ची स्थापना करण्यात आली असून, *पहिल्याच दिवशी महिलांनी आक्रमक भूमिका घेत गावातील दारूबंदी, अवैध धंदे व सामाजिक वाईट प्रवृत्तींविरोधात ठामपणे आवाज उठविला.
या बैठकीस गावातील सर्वच वयोगटातील महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती. समितीच्या वतीने गावात दारू विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. तसेच पोलिस प्रशासन आणि ग्रामपंचायतीने यावर लक्ष द्यावे, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली. महिलांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, “गावात मुलांना योग्य संस्कार द्यायचे असतील तर दारू व इतर अवैध व्यवसाय समूळ बंद झाले पाहिजेत.” या समितीच्या पुढाकारामुळे गावात सकारात्मक सामाजिक परिवर्तन घडून येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
यावेळी संरपच मंगलाताई सकट, माजी उपसरपंच संतोष भापकर, ग्रामपंचायत सदस्य सुनील भापकर, संतोष धावडे, सतिश चौधरी, श्याम कासार, नारायण भापकर, छबुराव येठेकर, ग्रामविकास अधिकारी अशोक जगदाळे, पत्रकार संजय भापकर,ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह अनेकांनी या उपक्रमाचे कौतुक करत महिलांच्या पुढाकाराचे स्वागत केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 3 2 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे