Breaking
ब्रेकिंग

सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेणारं मोदी सरकार डरपोक : किरण काळे

0 8 6 5 0 8

सोनम वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेणारं मोदी सरकार डरपोक : किरण काळे

नजीकच्या काळामध्ये भारताचा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही, हा वनवा आता सरकार रोखू शकत नाही

एस डब्ल्यु न्यूज / नेटवर्क

प्रतिनिधी : नीट पेपर फुटी नंतर तब्बल वीस पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. २१ जूनला झालेल्या फेर परीक्षेकडे तब्बल पावणेदोन लाख विद्यार्थ्यांनी नैराश्यातून पाठ फिरवली. देशातील तरुणाईच्या भवितव्याच्या सुरक्षिततेसाठी राजकारण विरहित राष्ट्रीय स्तरावरच आंदोलन दिल्लीमध्ये वैज्ञानिक तथा शिक्षण तज्ञ सोनम वांगचुक, अभिजीत दिपके यांच्यासह हजारो तरुणांनी उभं केलं आहे. त्यांच्या आमरण उपोषणाचा एकविसावा दिवस होता. मात्र आंदोलन चिरडण्यासाठी त्यांना जोर जबरदस्तीने उचलून नेत रुग्णालयात डांबण्यात आल आहे. वांगचुक यांना जबरदस्तीने उचलून नेणार मोदी सरकार हे डरपोक असल्याची टीका ठाकरे शिवसेनेचे महानगर प्रमुख किरण काळे यांनी केली आहे.

केंद्र सरकारच्या या कृतीमुळे देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. काळे म्हणाले, देशात लोकशाही उरलेली नाही. मागच्या वीस दिवसात सरकारचा एकही प्रतिनिधी साधा फिरकला सुद्धा नाही. आंदोलकांशी संवाद साधण्या ऐवजी दडपशाही केली जात आहे. तरुणाईचा आवाज बनलेले अभिजीत दिपके यांना झालेली मारहाण, आंदोलन स्थळी युवती आंदोलकांशी केलेले गैरवर्तन, विद्यार्थ्यांवर केलेला लाठीचार्ज यातून देशामध्ये नवा हिटलर जन्माला आला आहे हेच सिद्ध होते. सरकारची हीच भूमिका कायम राहिली तर नजीकच्या काळामध्ये भारताचा नेपाळ झाल्याशिवाय राहणार नाही. हा वनवा आता सरकार रोखू शकत नाही. सरकारच्या या दडपशाहीचा आम्ही तमाम अहिल्यानगरकर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र निषेध करतो.

आंदोलन राजकारण विरहितच रहावे :

तरुणाईच्या भवितव्याच्या संरक्षणासाठी उभे राहिलेले हे आंदोलन राजकारण विरहित आहे. ते तसेच राहणे आवश्यक आहे. वांगचुक यांना मागील दोन दिवसांपासून देशभरातून प्रचंड मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. तरुणाई, नागरिक स्वयंस्फूर्तीने रस्त्यावर उतरत आहेत. अहिल्यानगर शहरात देखील शुक्रवारी सायंकाळी शेकडो विद्यार्थी, विद्यार्थिनी, सजक नागरिकांनी काढलेला कॅन्डल मार्च समाजाची यावर असणारी तीव्र भावना व्यक्त करणारा आहे. या आंदोलनाला आम्ही ठाकरे शिवसेनेच्या वतीने पाठिंबा दिला आहेच. परंतु राजकीय नेते, कार्यकर्ते यांच्यापेक्षा सर्वसामान्य नागरिकांनीच या आंदोलनाचा चेहरा व्हावे, असे आमचे स्पष्ट मत आहे. अहिल्यानगरसह देशात ठिणगी पडली आहे. आता हा वनवा सरकार रोखू शकत नाही, असे किरण काळे यांनी म्हटले आहे.

मोदी सरकार असंवेदनशील :

नैतिकतेच्या मुद्द्यावरून यापूर्वी अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची उदाहरण आहेत. रेल्वे अपघातात शेकडो नागरिकांचा बळी गेला म्हणून तत्कालीन रेल्वेमंत्री लालबहादूर शास्त्री, एलआयसी घोटाळ्याच्या मुद्द्यावरून तत्कालीन अर्थमंत्री कृष्णमाचारी, भारत-चीन युद्धाच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तत्कालीन संरक्षण मंत्री के. कृष्ण मेनन यांच्या सह अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची उदाहरण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा यापूर्वीच घ्यायला हवा होता. प्रधान यांनी देखील पायउतार व्हायला हवे होते. डीलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी देशभर खासदार फोडाफोडी, राम मंदिराची तिजोरी लूट यामध्ये मश्गूल असणारे सरकार नींदेस पात्र आहे. मोदी सरकार असंवेदनशील टीका काळे यांनी केली आहे .

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे