Breaking
ब्रेकिंग

आदर्शगाव हिवरेबाजार मध्ये हिवाळी क्रिडा स्पर्धा संपन्न

0 3 9 0 5 1

आदर्शगाव हिवरेबाजार मध्ये हिवाळी क्रिडा स्पर्धा संपन्न   

नगर / प्रतिनिधी : रफिक शेख

नगर तालुक्यातील चास केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा आदर्शगाव हिवरेबाजार येथील जि.प. शाळेत संपन्न झाल्या. या क्रीडा स्पर्धामध्ये चास केंद्रातील सर्व शाळांनी सहभाग घेतला होता. या वर्षी नव्यानेच घेण्यात आलेल्या वैयक्तिक व मैदानी खेळांमध्ये मुलांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे. तर, सालाबादप्रमाणे जि .प हिवरेबाजार शाळेने चॅम्पियनशिप पटकावली असून पिंपळगाव कौडा शाळेने देखील आपले स्थान उच्च स्थानावर ठेवले आहे. तसेच, केंद्रातील निमगाव वाघा, चास, कामरगाव, भोयरेपठार या शाळांनी सुद्धा बक्षिसे मिळवली आहेत. या स्पर्धा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक बाबा जाधव , शिक्षक वृंद व शाळा व्यवस्थापन कमिटी व केंद्रातील सर्व शिक्षक वृंद यांनी मोलाचे सहकार्य केले. स्पर्धेतील विजेत्यांचे पदमश्री डॉ. पोपटराव पवार साहेब, सरपंच विमलताई ठाणगे, गटशिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, विस्तार अधिकारी निर्मला साठे, केंद्रप्रमुख संजय कळमकर यांनी विजयी खेळाडूंचे व त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 5 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे