शिक्षक समाजाचा आरसा :- ग.स.मा.चेरअमन सुभाष जाधव*
*शिक्षक समाजाचा आरसा :- ग.स.मा.चेरअमन सुभाष जाधव*
*शिक्षकांच्या सन्मानप्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव व मान्यवर*
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
पारोळा :- शिक्षकच समाजाचा आरसा आहे. शिक्षकांनी समाज घडवीण्याचे कार्य केले असून जीवनात संस्कार, परोपकार यांची खाण आपल्याला खऱ्या अर्थाने आपल्या गुरुजनाकडून मिळते. यासाठी आजचा दिवस त्यांचा सन्मानाचा असून आपण तो साजरा केलाच पाहिजे असे प्रतिपादन वसंतराव नाईक ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष तथा ग.स.पतपेढीचे माजी चेअरमन सुभाष जाधव यांनी केले.
पारोळा तालुक्यातील वसंतनगर येथील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेत शिक्षक दिनी ‘शिक्षक सन्मान’ सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गजमल जाधव, बछराज जाधव, अशोक जाधव, मुख्याध्यापिका श्रीमती एल.एस. पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक सोपान पाटील, जेष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, बी.पी.पाटील, एम.डी. सूर्यवंशी, डी.एस. पाटील, के. आर. पाटील, आर.सी. चौधरी, डी.एम. बडगुजर उपस्थित होते.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव यांच्याहस्ते प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हिरालाल पाटील यांनी केले तर आभार एस.जे. भामरे यांनी मानले.


