नगर तालुक्यातील विकासकामांचा अनुशेष भरून काढणार – आ. काशिनाथ दाते,
घोसपुरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन*
*नगर तालुक्यातील विकासकामांचा अनुशेष भरून काढणार – आ. काशिनाथ दाते,
घोसपुरी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन*
वाळकी प्रतिनिधी :- दादासाहेब आगळे
नगर आणि पारनेर तालुक्यातील जनतेने आपल्यावर आणि महायुतीवर विश्वास दाखवून मला विधानसभेत पाठविले आहे. त्यांच्या विश्वासाला तडा जावून देणार नाही. फक्त पारनेरच नव्हे तर नगर तालुक्यातील विकासकामांचा अनुशेष आगामी काळात भरून काढला जाईल, असे प्रतिपादन पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते यांनी केले.
नगर तालुक्यातील घोसपुरी येथे स्मशानभूमी शेड (अंदाजित रक्कम १० लाख), घोसपुरी ते घुटेवाडी रस्ता डांबरीकरण (अंदाजित रक्कम २० लाख) या दोन्ही कामांचे भूमिपूजन आ. दाते यांच्या हस्ते शुक्रवारी (दि.२९) झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उद्योजक दिलीप दाते, पंचायत समितीचे माजी सभापती अशोक झरेकर, सरपंच किरण साळवे, माजी उपसरपंच उद्योजक प्रभाकर घोडके, आबा घोडके, सुहास लांडगे, अशोक हंडोरे, पोपट झरेकर, दत्तात्रय हंडोरे मेजर, सुभाष ईधाते मेजर, सुभाष झरेकर मेजर, मिठू झरेकर आदी उपस्थित होते.
यावेळी आ.दाते यांनी गावातील तांडावस्ती येथील पथदिव्यांच्या कामासाठी १२ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. तसेच नगर तालुक्यात २७ मे रोजी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे वाहून गेलेले रस्ते, पुल तसेच इतर नुकसान मोठ्या प्रमाणावर झालेले आहे. त्या कामांसाठीचे प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी पाठविलेले आहेत. या दुरुस्ती कामांना मोठ्या प्रमाणावर निधी मिळावा यासाठी आपण शासनस्तरावर पाठपुरावा करत असल्याचे सांगितले. लवकरच या कामासाठी निधी उपलब्ध होईल असेही ते म्हणाले.



