शिक्षक भारती संघटनेचे २२ जानेवारीला असंतोष आंदोलन
शिक्षण आयुक्त कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी रानडे यांना दिले निवेदन
शिक्षक भारती संघटनेचे २२ जानेवारीला असंतोष आंदोलन
शिक्षण आयुक्त कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी रानडे यांना दिले निवेदन
राहुरी वृत्तसेवा / जावेद शेख
विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय पुणे येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भात, व उपसंचालक कार्यालयातील भ्रष्ट व मग्रूर लिपिक यांच्या विरोधात शिक्षण आयुक्त यांच्या दलनासमोर असंतोष आंदोलन पुणे विभागीय शिक्षक भारती संघटना करणार आहे अहिल्यानगर,सोलापूर,पुणे जिल्ह्याचे सर्व शिक्षक भारती पदाधिकारी,सदस्य ,प्रलंबित प्रश्न असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित राहणार आहे यावेळी अन्यायग्रस्त कर्मचारी यांनीही उपस्थित राहण्याचे आव्हान कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक भारती संघटना अहिल्यानगर च्या महिला जिल्हाध्यक्ष रूपालीताई कुरूमकर यांनी केले शिक्षण आयुक्त कार्यालयातील प्रशासकीय अधिकारी रजनी रानडे यांना आंदोलनाचे निवेदन यावेळी देण्यात आले.
या आंदोलनास राज्य सचिव सुनील गाडगे, उच्च माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष रामराव काळे, सरचिटणीस महेश पाडेकर, माध्यमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब जगताप, सोलापूर जिल्हाध्यक्ष सुजित काठमोरे, पुणे जिल्हाध्यक्ष अशोक बोबडे,सचिव विजय कराळे, महिला जिल्हाध्यक्षा रूपाली कुरुमकर, जिल्हा उपाध्यक्ष सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, प्रसिद्धीप्रमुख अमोल चंदनशिवे ,तालुका अध्यक्ष संजय सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, संजय भालेराव, संजय तमनर,नानासाहेब खराडे, रूपालीताई बोरुडे, मफीज इनामदार,कल्पना चौधरी, अकील फकीर,बाबाजी लाळगे,संपत वाळके उपस्थित होते .