अनंतराव पवार विद्यालयात आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न …
अनंतराव पवार विद्यालयात आंतरशालेय विज्ञान प्रदर्शन संपन्न …
इंदापूर / प्रतिनिधी
इंदापूर : निर निमगाव (ता.इंदापूर) सोमवार दि. २ ) अनंतराव पवार विद्यालयात इ.५वी ते १०वी तील १४० विद्यार्थ्यांनी आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनात सहभाग घेतला. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी एकूण ८१ प्रकल्प सादर केले. या प्रदर्शनाचे उद्घाटन कै. अनंतराव पवार ग्राम विकास प्रतिष्ठानच्या विश्वस्त सौ शोभाताई दत्तात्रय घोगरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
या विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीला चालना मिळून नवनिर्मितीस प्रोत्साहन मिळेल, सर्वच प्रकल्प दर्जेदार झाले असून त्यामध्ये उल्लेखनीय प्रकल्प सौर कृषी पंप, राज्य व राजधानी मॉडेल, आम्ल पर्जन्य, वायू प्रदर्शन, कार्बन शुद्धीकरण, स्मार्ट ॲग्रीकल्चर, प्रोजेक्टर, वॉटर मेजर, कचरा व्यवस्थापन इत्यादी उल्लेखनीय प्रकल्प विद्यार्थ्यांनी तयार करून सादरीकरण केले.
या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष रणजीत घोगरे, रामदास गरगडे, विलास मकर सर, प्रताप देवडे, भीमराव गरगडे, चंद्रकांत जाधव, सचिन पवार, लक्ष्मण साळुंखे, सुनील कोळेकर, जितेंद्र जाधव, सौ रुक्मिणी कोळेकर, सुरेखा वाघमोडे, व विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.जे गरगडे सर व मोठ्या प्रमाणात पालक वर्ग उपस्थित होते.
परीक्षक म्हणून लहान गटासाठी श्री गवळी एन. बी ,श्री गोरे ए. पी., श्री घोगरे एस.एम व मोठया गटासाठी श्री मुलाणी एस.एम, मकर व्ही. व्ही.घोगरे ए. डी.यांनी काम पाहिले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे बी.एम यांनी केले तर आभार श्री डोळे ए.एस यांनी मानले.
या प्रदर्शनात लहान गट( इ.५वी ते ७वी) विद्यार्थ्यांमधीलप्रथम क्र. गौरव जितेंद्र जाधव- सौर कृषी पंप.
कन्हैया सचिन वायकर (एस. एस. टी मॉडेल )राज्य व राजधान्या.
द्वितीय क्र.
अमृता कल्याण घोगरे, सिद्धी जयवंत आगलावे ,श्रेया प्रशांत बुरुंगले- ऍसिड रेन
जानव्ही हनुमंत पाटील, श्रावणी संतोष घोगरे, आरती तात्या ठोंबरे – वायु प्रदर्शन व जलप्रदूषण .
तृतीय क्र: चैतन्य तुकाराम महानवर टेबल फॅन.
प्रमोद बिभीषण यादव, निरंजन मोहन सूर्यवंशी, सोहम तानाजी लाळगे- विघ्नहर्ता डी जे .
—————————————-
मोठा गट (इ.८वी ते इ.१०वी)
प्रथम क्र : पवन अरुण जाधव, तोसीफ असलम मुलाणी ,अमित पोपट साळुंखे- कार्बन शुद्धीकरण प्रकल्प .
ओम दिलीप गरगडे, आदित्य संतोष गरगडे- स्मार्ट ॲग्रीकल्चर.
द्वितीय क्र : हर्षवर्धन सुभाष पिसे, शनी बाळू भिटे – घनकचरा व्यवस्थापन.
अस्मिता लक्ष्मण साळुंखे, अंतरा सहदेव निकम- स्वच्छ भारत .
तृतीय क्र: विकास बलभीम वाघमोडे, ओंकार दादासो मजगे – प्रोजेक्टर .
ओम नामदेव दडस ,ओंकार बंडू चोरमले – पाणी मापन .
उत्तेजनार्थ :-अनुष्का प्रकाश शिरसाट, रिया अण्णा देवकुळे- श्वसन संस्था.
कु. तपस्या संदिपान देवडे, कु. पूनम विजय चव्हाण – सूर्यमाला