Breaking
ब्रेकिंग

पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात ; श्रेयस वाघ, रितविका गोंडगिरे, प्रियांका सिनारे प्रथम

‘रील पाहण्यापेक्षा पुस्तक वाचा’; आयुक्त यशवंत डांगे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

0 8 9 6 7 5

पद्मशाली सोशल फाउंडेशनच्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात ; श्रेयस वाघ, रितविका गोंडगिरे, प्रियांका सिनारे प्रथम

‘रील पाहण्यापेक्षा पुस्तक वाचा’; आयुक्त यशवंत डांगे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

 

अहिल्यानगर : पद्मशाली सोशल फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ श्री मार्कंडेय शैक्षणिक संकुल, नेप्ती नाका, अहिल्यानगर येथे उत्साहात पार पडला. या स्पर्धेला तब्बल ४५० स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. इयत्ता ५वी ते ७वी, इयत्ता ८वी ते १०वी आणि खुला गट अशा तीन गटांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके, सन्मानचिन्हे व प्रमाणपत्र देऊन व फेटा बांधून गौरविण्यात आले. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त शिक्षिका सुरेखा आडम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून अहिल्यानगर महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, श्री मार्कंडेय मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मंगलारप, अहिल्यानगर महानगरपालिकेचे विषयतज्ज्ञ अरुण पालवे, शिक्षण विस्तार अधिकारी शेख राज मोहम्मद, सामाजिक कार्यकर्ते रवी दंडी, इंजि. प्रशांत कोक्कुल, पद्मशाली सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लकशेट्टी आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, आजच्या काळात विद्यार्थ्यांचा मोठा वेळ मोबाईल आणि रील पाहण्यात जात आहे. विद्यार्थ्यांनी रील पाहण्यापेक्षा पुस्तकांकडे पाहावे, पुस्तक वाचावे आणि वाचनातून ज्ञान मिळवावे. वाचनामुळे विचारांची व्याप्ती वाढते, लेखनकौशल्य विकसित होते आणि व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत होते. विद्यार्थ्यांनी विविध विषयांवरील पुस्तके वाचावीत, आपल्या मनातील विचार मांडावेत आणि अशा स्पर्धांमध्ये सातत्याने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
पद्मशाली सोशल फाउंडेशनने गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला वाव मिळावा तसेच नागरिकांच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि पर्यावरणीय पैलूंवर विचारमंथन व्हावे, या उद्देशाने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेला ४५० स्पर्धकांनी सहभाग नोंदवून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांना आपल्या विचारांना व्यासपीठ मिळावे आणि ते व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम पद्मशाली सोशल फाउंडेशनने केले आहे, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात निवृत्त शिक्षिका सुरेखा आडम म्हणाल्या की, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन आणि लेखन या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांनी केवळ पाठांतरावर अवलंबून न राहता विविध विषयांचे वाचन करून त्यावर स्वतःचा विचार करण्याची सवय लावून घ्यावी. निबंध स्पर्धेसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना आपल्या भावना, विचार आणि कल्पना शब्दबद्ध करण्याची संधी मिळते. पद्मशाली सोशल फाउंडेशनने गणेशोत्सवाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या लेखनकौशल्याला चांगले व्यासपीठ मिळाले आहे. तब्बल ४५० स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये लेखन आणि विचार करण्याची आवड निर्माण होत असल्याचे दिसून येते. अशा उपक्रमांना पालक, शिक्षक आणि समाजाने प्रोत्साहन दिल्यास विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास निश्चितच मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
अध्यक्षीय प्रास्ताविक
प्रास्ताविकात पद्मशाली सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश लकशेट्टी म्हणाले की, गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता सामाजिक आणि सांस्कृतिक जाणीवा जागृत करणारा उत्सव व्हावा, या उद्देशाने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी गणेशोत्सवातील सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरणीय आणि आर्थिक पैलू समजून घ्यावेत, आपल्या विचारांना लेखणीच्या माध्यमातून व्यक्त करावे, यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली. तीनही गटांमध्ये मिळून ४५० स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने फाउंडेशनच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ देण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून भविष्यातही विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
स्पर्धेतील विजेत्यांची नावे अमोल गुंडू यांनी वाचून दाखविली. सूत्रसंचालन श्रीनिवास बुरगुल यांनी केले, तर आभार प्रदर्शन इंजि.अक्षय बल्लाळ यांनी केले.

विजेते स्पर्धक –
इयत्ता ५वी ते ७वी : प्रथम – श्रेयस प्रदीप वाघ, (रेसिडेन्सिअल हायस्कूल), द्वितीय – शुभ्रा उदय तरवडे (श्री समर्थ विद्यामंदिर सावेडी), तृतीय – इशिका राहुल चिलका ( कै वि.ल. कुलकर्णी शाळा), उत्तेजनार्थ– श्रेया वैभव तांदळे ( श्री समर्थ विद्यामंदिर सावेडी) व अनुष्का गोरख संभार (श्री मार्कंडेय विद्यालय), हस्ताक्षर – श्रेयस प्रदीप वाघ (रेसिडेन्सिअल हायस्कूल).
इयत्ता ८वी ते १०वी : प्रथम – रितविका भाऊसाहेब गोंडगिरे (श्री समर्थ विद्यामंदिर सावेडी), द्वितीय – देविका महेश साळुंके (रेसिडेन्सिअल हायस्कूल), तृतीय – वैभवी योगेश गोडळकर (श्री समर्थ विद्यामंदिर सावेडी ) उत्तेजनार्थ – सिद्धांत माऊली कुसाळकर (रेसिडेन्सिअल हायस्कूल) व लावण्या किरण साठे (रेसिडेन्सिअल हायस्कूल) हस्ताक्षर – अनुष्का चंद्रकांत फसले (रेसिडेन्सिअल हायस्कूल)
खुला गट : प्रथम – सौ. प्रियांका सचिन सिनारे, द्वितीय – साईगीता गणेश सब्बन, तृतीय – शिल्पा अरुण दहातोंडे, उत्तेजनार्थ – अक्षदा दत्तात्रय वडवणीकर व नेहा वधवा. हस्ताक्षर व विशेष पुरस्कार संतोष जगताप
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गणेश लकशेट्टी, अजय लयचेट्टी, श्रीनिवास बुरगुल, अमोल गुंडू, राजेंद्र बुलबुले, अक्षय बल्लाळ, मयूर जिंदम, अमित सुंकी, शंकर जिंदम, वरद लकशेट्टी, शुभम सुंकी, प्रतिक उकिर्डे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी रोहित अलवाल, निलेश अलवाल, ओंकार यन्नम, सौ. गायत्री यन्नम, भूषण येनगुल, चंद्रकांत बेती, सागर गाजेंगी, प्रशांत कोक्कुल, दत्तात्रय जोग, कृष्णा पेंडम, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेता नारायण मंगलारप, पियुष गांगर्डे, अमोल गाजेंगी, श्री मार्कंडेय देवस्थान ट्रस्ट, महेंद्र लकशेटी, दत्ताशेठ लकशेटी, वरद अन्नलदास, ऋषिकेश दसकन आदींनी सहकार्य केले.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे