Breaking
ब्रेकिंग

जागृती वाचनालय बेलापूर खुर्द येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती साजरी..

0 3 9 0 2 6

जागृती वाचनालय बेलापूर खुर्द येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंती साजरी..

राहुरी / प्रतिनिधी : जावेद शेख

बुवाजी बाबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अण्णासाहेब राशिनकर यांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला व अहिल्यादेवींना अभिवादन करण्यात आले. यावेळी अण्णासाहेब राशिनकर यांनी अहिल्यादेवी मुळे महिलांना मान सन्मान मिळालेला आहे चोंडी सारख्या एका छोट्या गावातील एक धनगर समाजातील मुलगी इंदोर व महेश्वर सारख्या साम्राज्याची महाराणी होते आणि गोरगरीब जनतेसाठी आपलं राज्य चालवते खरंतर छत्रपती शिवरायांच्या नंतर उत्तर भारतात अहिल्यादेवींनी शिवरायांच्या विचारावर सामान्यांसाठी गरिबांसाठी र शेतकरी शेतमजुरांसाठी सोयी सुविधा निर्माण केल्या. अहिल्यादेवींनी संपूर्ण भारतभर मंदिराचा जिर्णोद्धार केलाच त्याचबरोबर लोकहितासाठी नदीकाठी घाट बांधले रस्त्यांवर धर्मशाळा बांधल्या. महिलांच्या बचत गटाच्या जनक अहिल्यादेवी होळकर यांनाच म्हटले पाहिजे महेश्वर च्या किल्ल्यामध्ये त्यांनी हातमाग सुरू करून महिलांना स्वयंरोजगार पहिल्यांदा निर्माण करून दिला आजही महेश्वर किल्ल्यामध्ये ते हातमागवरच्या माहेश्वरी साड्या प्रसिद्ध आहे. अहिल्यादेवी होळकर हे त्याग व शौर्य यांचे प्रतीक आहे सुमारे 30 वर्ष राज्य कारभार करताना त्यांनी शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांच्यासाठी अनेक योजना राबवल्या आहेत त्यांचा आदर्श आज राजकर्त्यांनी व समाजाने घ्यायला हवा असेही अण्णासाहेब राशिनकर यांनी सांगितले याप्रसंगी सुनील बडदे श्रीअण्णासाहेब कापसे गणेश जाधव श्री बारहाते पाटील व इतर नागरिक उपस्थित होते..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 2 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे