सिंजटा फाउंडेशन अंतर्गत भक्ती ट्रेडर्स आयोजित ऊस शेती प्रात्यक्षिक व शेतकरी मेळावा
सिंजटा फाउंडेशन अंतर्गत भक्ती ट्रेडर्स आयोजित ऊस शेती प्रात्यक्षिक व शेतकरी मेळावा
राहुरी तालुका जावेद शेख
राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे शेतकरी श्री.भगवान अडसुरे यांच्या शेतात शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला यास शेतकर्यांनी उदंड अस प्रतिसाद दिला.
या मेळाव्यात शेतकऱ्यांना शेती चे आरोग्य कसे जपले पाहिजे या विषयी माहिती देण्यात आली रासायनिक खते कीडनाशके यांचा बेसुमार वापर शेती साठी आणि मानवी आरोग्य साठी किती धोकादायक आहे तसेच कमी खर्चात फायदेशीर शेती कशी करावी याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठ चे प्रमुख कृषी विद्यावेत्ता डॉ उल्हास सुर्वे सर यांनी मार्गदर्शन केले तसेच MPKV चे प्रसारण प्रमुख सदाफळ सर यांनी विद्यापीठ अंतर्गत शेतकऱ्यांसाठी असणारे योजनांची माहिती देऊन शेतकऱ्यांनी कृषी विद्यापीठ मधील शास्त्रज्ञांचा ज्ञानाचा उपयोग करून घ्यावा
त्याचप्रमाणे सिंजटा फाऊंडेशन चे Exicutive Director डॉ राजेंद्र जोग सर यांनी फाऊंडेशन चे कार्य कसे चालते व कृषी उद्योजक निर्माण करण्यामागील उद्देश सांगितले त्याचप्रमाणे गुजरात मधील Agriculture defance fund चे मिर्झा सर यांनी हवामान बदलामुळे शेती कर काय परिणाम झाले आहे आहे आणि त्यासाठी आपण काय केले पाहिजे याविषयी बहुमोल असे मार्गदर्शन केले आणि शेवटी परिसरातील कृषी भूषण मा श्री. सुरसिंगराव पवार यांनी शेतकऱ्यांना असणाऱ्या समस्या आणि त्यावरील उपाय योजना काय करायला पाहिजे याविषयी माहिती देली .
सिंजटा फाऊंडेशन चे जिल्हा समन्वयक श्री पवन थोरात सर यांनी सुत्रसंचलन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.


