हिंदू संमेलन उत्साहात संपन्न ; हिंदू बंधू व भगिनींचा उल्लेखनीय सहभाग
राजवीर या बालकाने छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा केला सादर
हिंदू संमेलन उत्साहात संपन्न ; हिंदू बंधू व भगिनींचा उल्लेखनीय सहभाग
राजवीर या बालकाने छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा केला सादर
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर :- अमळनेर शहरातील श्री स्वामी समर्थ मंदिर येथून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक व मुख्य कार्यक्रमास परिसरातील हिंदू बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या हिंदू संमेलनात भोजन प्रसादाची व्यवस्था ही परिसरातील सर्व डॉक्टर्स बंधूं कडून करण्यात आली . तसेच इतर सर्व खर्च परिसरातील प्रतिष्ठित हिंदू बंधू कडून करण्यात आला. या हिंदू संमेलनात आपल्या हिंदू संस्कृतीवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रम, नारायणी महिला मंडळाकडून धार्मिक गीतांचा सादरीकरण करण्यात आले तसेच चिरंजीव राजवीर चंद्रकांत कंखरे या लहान बालकाने छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाडा सादर केला तसेच परिसरातील साई लहरी या भजनी मंडळ कडून प्रसिद्ध भजनांचे सादरीकरण केले आणि त्यानंतर प्रमुख संत श्री बालकनाथ जी महाराज यांनी आशीर्वाचन सांगितले तसेच प्रमुख वक्त्यांचे बौद्धिक सांगण्यात आले. प्रमुख वक्ते यांनी पंच परिवर्तन सामाजिक समरसता कुटुंब प्रबोधन पर्यावरण संरक्षण
स्वदेशी नागरी कर्तव्य या प्रमुख पाच गोष्टींवर प्रबोधन केले.
हिंदू संमेलनाचे सूत्रसंचालन श्री रवींद्र लष्करे सर तसेच प्रास्ताविक श्री प्रशांत वंजारी सर व आभार प्रदर्शन श्री यश राजेंद्र वर्मा यांनी केले . प्रजापिता ब्रह्मकुमारी येथील श्रीमती विद्या दीदी, व शिवम कुटिया येथील माताजी या उपस्थित होत्या.तसेच प्रमुख वक्ते श्री स्वप्नाली चौधरी यांच्या ऐवजी भुसावळ येथील इतिहास संशोधक श्री प्रवीणजी नायसे हे होते.तसेच हिंदू संमेलना घेण्यापूर्वी परिसरातील नागरिकांची एक स्वागत समिती तयार करण्यात आली व या स्वागत समितीत अध्यक्ष म्हणून मराठा कॉलनी येथील श्री प्रशांत रंगराव शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली. संपूर्ण हिंदू संमेलन हे अध्यक्ष श्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.



