Breaking
ब्रेकिंग

​प्रा. गोरखनाथ गवळी यांची ‘शिक्षक भारती’ श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी निवड

0 8 6 5 1 0

प्रा. गोरखनाथ गवळी यांची ‘शिक्षक भारती’ श्रीगोंदा तालुकाध्यक्ष पदी निवड

राहुरी तालुका जावेद शेख

श्रीगोंदा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्रा. गोरखनाथ बाळासाहेब गवळी यांची शिक्षकांची शासनमान्य ‘शिक्षक भारती’ संघटनेच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्ष (उच्च माध्यमिक विभाग) पदी निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या राज्य व जिल्हा कार्यकारिणीने त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाची दखल घेत ही महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली आहे.
​संघटनात्मक बांधणीवर भर
प्रा. गवळी यांची ही नियुक्ती सन २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी असेल. श्रीगोंदा तालुका स्तरावर शिक्षक भारतीची संघटन बांधणी करणे, संघटनेचा प्रसार व प्रचार करणे आणि शिक्षण क्षेत्रात समता, प्रतिष्ठा व संधी निर्माण करण्यासाठी ते कटिबद्ध राहतील. लोकशाही, धर्मनिरपेक्ष आणि विज्ञानभिमुख समाजरचनेच्या ध्येयाने ते कार्य करणार आहेत.
शिक्षक भारतीचे संस्थापक आमदार कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड जाहीर करण्यात आली आहे. पुणे विभाग कार्याध्यक्ष प्रा. महेश पाडेकर ,अहिल्यानगरचे जिल्हाध्यक्ष प्रा. रामराव काळे, महिला अध्यक्ष प्रा. रुपालीताई कुरूमकर यांच्या स्वाक्षरीने त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
​तालुक्यातील शैक्षणिक घडामोडी आणि शिक्षकांचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची जबाबदारी आता प्रा. गवळी यांच्यावर असणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा उपाध्यक्ष संजय तमनर, सचिन जासूद,दादासाहेब कदम, कोषाध्यक्ष गोपाळ दराडे, संघटक चंद्रशेखर हासे,सहसचिव राहुल कानवडे ,तालुका अध्यक्ष सुमंत शिंदे, नरेंद्र लहिरे, साई थोरात,संपत वाळके,दिगंबर देसाई,रूपालीताई बोरुडे,कल्पना चौधरी, मफीज इनामदार,दीपक फापाळे,गणपत धुमाळ,विजय पांडे, अमोल तळेकर,संतोष नवले,बाबासाहेब तांबे,अकील फकीर,बाबाजी लाळगे,वैभव चोथे,प्रवीण मालुंजकर,श्याम जगताप आदी पदाधिकारी यांनी अभिनंदन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 1 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे