ज्ञानसंपदा शाळेत व्याख्यानमालेचे आयोजन
ज्ञानसंपदा शाळेत व्याख्यानमालेचे आयोजन
एस डब्ल्यु न्यूज / प्रतिनिधी
दिनांक 8जानेवारी ते 10 जानेवारी 2025 रोजी ज्ञानसंपदा शाळेत विद्यार्थ्यांसाठी,पालकांसाठी तसेच नगरकरांच्या विचारात भर पडावी, त्यांची वैचारिक प्रगल्भता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने विविध क्षेत्रातील विचारवंत, साहित्यिक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक इतिहासकार, कलाकार, प्रशासकीय अधिकारी, इत्यादी मान्यवरांचे ज्ञानसंपदा व्याख्यानमालेत व्याख्यानाचे आयोजन केले जाते. यंदा या व्याख्यानमालेचे चौदावे वर्ष आहे
यंदाच्या व्याख्यानमालेची पहिले पुष्प बुधवार दिनांक 8 जानेवारी रोजी ज्येष्ठ पत्रकार व वृत्त निवेदक डॉक्टर उदय निरगुडकर ध्यास सर्वोत्तमाचा या विषयावर गुंफणार आहेत. गुरुवार दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी प्रसिद्ध व्याख्याते अभयजी भंडारी हे भारतीय सांस्कृतिक मूल्य व शिक्षण या विषयावर आपले मौलिक विचार मांडणार आहेत. तसेच दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी प्रवचनकार गुरुदेव शंकर जी अभ्यंकर हे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद या विषयावर आपले अलौकिक विचार मांडणार आहेत.
ठिकाण माऊली सभागृह झोपडी कॅन्टीन, सावेडी अहिल्यानगर येथे सायं 6.30 वाजता सुरू होईल.