लाभार्थी गावाच्या नावाखाली स्वतःचे पाप आमदारांनी झाकू नये:- मा. सरपंच आशिष गायकवाड*
*लाभार्थी गावाच्या नावाखाली स्वतःचे पाप आमदारांनी झाकू नये:- मा. सरपंच आशिष गायकवाड*
प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. १२/ करमाळा तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या जळीत पाईप प्रकरणी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना विद्यमान आमदार नारायण पाटलांनी लाभार्थी गावांचाच बंद नलीका वितरण प्रणालीच्या कामाला विरोध आहे आणि आमचाही त्याला विरोध आहे असे सांगितले. वस्तुस्थिती मात्र पूर्णपणे वेगळी आहे माझ्या देवळाली गावातील सुरू असलेले काम स्थानिक लोकांनी बंद पाडले नाही तर आमदाराच्या गोरख जाधव या कार्यकर्त्यांनी येऊन ते काम बंद पाडले. त्यावेळेस मी स्वतः त्याला विचारणा केली असता आमदारांशी कंत्राट दाराला बोलायला लावा आणि त्यानंतर काम सुरू करा असे उत्तर जाधव यांनी दिले होते. त्यावेळेस गोरख जाधवला मी आमदारांना फोन लावा असे सांगितले त्यावेळेस त्यांनी फोन आमदारांचे बंधू राजू पाटील यांना लावला आणि ते म्हणाले की सरपंच कंत्राटदाराला आबांना भेटायला पाठवा विषय वाढणार नाही काम सुरू होईल. याचाच अर्थ विशिष्ट लाभ आपल्याला मिळावा या हेतूने आमदारांच्या आशीर्वादानेच संबंधित काम बंद पाडले, पाईप जाळले असे असताना त्यावरती पांघरून घालण्यासाठी लाभार्थी गावांचा बंद नलिका कामाला विरोध आहे असे आमदारांचे बोलणे म्हणजे आपले पाप झाकून ठेवण्याचा प्रकार असल्याचा घनाघात आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक तथा देवळालीचे माजी सरपंच आशिष गायकवाड यांनी नारायण पाटील यांच्यावर केला.
आपले बंधू राजू अण्णा पाटील आणि गोरख जाधव यांच्याशी माझा संबंध नाही असे जाहीरपणे नारायण पाटील यांनी सांगावे. जर त्यांना या कामाला विरोधच करायचा असेल तर ते स्वतः आमदार आहेत त्यांनी तसं लेखी पत्र सरकारला द्यावे आणि बंद नलिका या कामाचा निधी खुल्या कॅनल साठी वापरावा परंतु लोकांना पाणी द्यावे. माझ्या गावाला अद्याप पाणी आलेले नाही. ज्या बंदनलिकेतून पाणी येणार होते ते काम सुद्धा आपण थांबवले आहे. एक तर सहा महिन्यांमध्ये एक रुपयाचा निधी आपल्याला आणता आला नाही आणि दुसऱ्याने आणलेल्या निधीची कामे मात्र आपण थांबवत आहात हे चुकीचे आहे. आपण सरकारचे प्रतिनिधी असून सरकारी काम बंद पाडण्याचे समर्थन करत आहात. याचाच अर्थ पाईप जाळणे हे काम सुद्धा आपल्याच आशीर्वादाने सुरू आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही असाही टोला त्यांनी लगावला.



