Breaking
ब्रेकिंग

स्व:शिवाजीराव कर्डिले यांना दहिगाव ग्रामस्थांच्या वतीने श्रध्दांजली

0 8 6 7 0 5

स्व:शिवाजीराव कर्डिले यांना दहिगाव ग्रामस्थांच्या वतीने श्रध्दांजली

सरपंच ते आमदार मंत्री संघर्ष प्रवास

नगर / प्रतिनिधी : शिवा म्हस्के

स्व. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनार्थ दहिगाव येथे शोकसभा आयोजित करण्यात आली स्व. शिवाजीराव कर्डिले यांचे नगर तालुक्यातील सर्वच गावात विशेष योगदान होते. त्यांमुळे सर्वच गावात त्यांच्या निधनार्थ शोकसभा घेण्यात आल्या. दहिगाव वर कर्डिले साहेब यांचे विशेष प्रेम होते. या वेळी पत्रकार शिवा म्हस्के यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दहिगावचा आहे दहिगावचा सबस्टेशनचा ३.५ कोटी निधी महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावू दिला, बुर्हानगर पेयजल योजना मार्गी लावली आज या योजनेचा माध्यमातून अनेक गावं मुळा डॅम पाणी पित आहेत.मध्यधंतरी काळात आमदार नसतानाहि दहिगाव ला श्री राम मंदिर देवस्थान समोर प्लेविन बाॅल्क बसवणसाठी २० लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. जनसामान्यांच्या कामांसाठी ते तत्परतेने मार्गी लावले जात होते. श्री मंदिर ट्रस्ट कोषाध्यक्ष बाबासाहेब बनकर यांनी जिल्हा सहकारी बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गाय दुध व्यवसाय वाढीसाठी २० हजार रुपये गायी भांडवल उपलब्ध करून दिले.या गायी भांडवल साठी ईतर संचालक विरोध झाला हे पैसे वसुली जबाबदारी कोण घेणार तेव्हा त्यावेळी कर्डिले यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि साखर कारखाना कर्ज देताना सदर कर्ज हमी कोणी घेतली किती वसुली बाकी आहे. ते उत्तर द्या हि कळकळ तळमळ शेतकरी हितासाठी लढाणरे नेतृत्व कर्डिले यांच्या होते. गाय खरेदी साठी कर्ज मंजूर करण्यात यशस्वी झाले .स्व: शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करताना जुन्या आठवणींना उजाळा दिला

या वेळी दहिगावचे माजी सरपंच जयवंत शिंदे, माजी सरपंच सुनील म्हस्के, बाबासाहेब बनकर, ॲड पोपट म्हस्के,बाळासाहेब हंबर्डे, राजेंद्र हंबर्डे, गोरख म्हस्के, मोहन निमसे, मधुकर म्हस्के, महेश म्हस्के, राहुल पोटरे, जावेद शेख, सुनिल म्हस्के सर ,ग्रामपंचायत सदस्य गणेश हिंगे, महादेव म्हस्के, मोहन कांबळे, नागेश वाघ, सेवा सोसायटी चेअरमन भानुदास ढेरे,भालसिंग अशोक जावळे, सतिश म्हस्के,अनशाबापु म्हस्के, शरद किलेॅ, अमीर शेख, बाळासाहेब म्हस्के, साहेबराव म्हस्के, भाऊसाहेब आन्हाड महाराज,अनिल शिंदे, रामदास हिंगे,आसाराम वाघ, सागर देवतेस, सुदाम बनकर, गोवर्धन म्हस्के,संपत म्हस्के, रवी पोटरे, नाना गायकवाड,या शोकसभे प्रसंगी गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी , ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते..

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 7 0 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे