पोलीस भरती झालेल्या दोघा तरुणांचा निसर्डी गावाने केला सत्कार
पोलीस भरती झालेल्या दोघा तरुणांचा निसर्डी गावाने केला सत्कार
प्रतिनिधी :- पंकज पाटील
अमळनेर : तालुक्यातील निसर्डी येथील योगेश लोटन पाटील व रोहित राजु पाटील यांची मुंबई पोलीस मध्ये निवड झाल्याबद्दल गावकऱ्यांनी त्यांचा सत्कार केला.गावातील युवकांनी मेहनत करून अभ्यास करून स्वबळावर यश मिळवावे म्हणून तरुणांना प्रेरणा देण्यासाठी गावकऱ्यांनी दोन्ही नवनियुक्त पोलिसांचा सत्कार केला. तसेच तरुण मुलांना स्पर्धा परिक्षा पुस्तक वाटप करण्यात आले.
यावेळी सरपंच वैशाली प्रविण पाटील व वडील लोटन पाटील , राजु पाटील आई मनिषा पाटील , कविता पाटील , भरत पाटील ,मोहन पाटील, दाजभाऊ पाटील, रावसाहेब पाटील ,योगेश पाटील, जितेंद्र पाटील ,प्रकाश पाटील, संजय पाटील ,भिकन पाटील, सुरेश पाटील ,दिपक पाटील, जगदीश पाटील, भुषण पाटील, राहुल पाटील पंकज पाटील, रतन पाटील गावातील महिला व तरुण व ग्रामस्थ उपस्थित होते.