छत्रपती शिवाजीनगर येथील दत्त ग्रुप महिलांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

छत्रपती शिवाजीनगर येथील दत्त ग्रुप महिलांच्या वतीने गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी
वि.उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- आपल्या जीवनात गुरुला प्रथम स्थान
देण्यात आले आहे म्हणून दरवर्षोप्रमाणे छत्रपती शिवाजीनगर येथील दत्त ग्रुप महिला गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रम साजरा करतात. यावर्षी पण त्यांनी आदरणीय महानंदा ताई यांच्या मार्गदर्शनाने गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रम उत्साहात साजरा केला.
आदरणीय जयश्री ताई जळगावहून आल्यात खूप सुंदर होम हवन केले .सोबत मार्गदर्शन केले. नवीन योग शिक्षक ज्योती माळी यांचा सत्कार केला तसेच ज्यांचा नेहमी कोणत्याही कार्यक्रमाला हातभार लागतो असे नगरसेवक दादासो प्रताप शिंपी व मनीषा प्रताप शिंपी यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक जळगाव जिल्हा महामंत्री सौ ज्योती ताई पाटील यांनी केले. आभार ज्योतीताई माळी यांनी मानले .सर्व साधक कर्मठ कार्यकर्त्यांनी मिळून कार्यक्रम पार पाडला.



