शुभांगी ताई यांनी सरपंच उपसरपंच यांच्या घेतल्या भेटीगाठी

शुभांगी ताई यांनी सरपंच उपसरपंच यांच्या घेतल्या भेटीगाठी
वि. उपसंपादक :- पंकज पाटील
अमळनेर :- एकी कडे अनेक महाविकास आघाडीचे कार्यकर्ते महायुतीत जात आहेत. तर दुसरीकडे उ.बा.ठा. महाराष्ट्र राज्य उपनेत्या शुभांगी ताई पाटील तसेच जळगाव जिल्हा अध्यक्ष दिपक पाटील यांनी अमळनेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये सरपंच उपसरपंच यांच्या भेटीगाठी घेतल्या व त्यांच्या समस्या समजून घेतल्या. लवकरच त्या मार्गी लागतील असे आश्वासन दिले. सरपंच हा गावाचा पहिला नागरिक असतो. शुभांगी ताई यांनी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अनेक प्रकारचे कामे हि जळगाव जिल्हा अध्यक्ष दीपक पाटील त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांच्या हितासाठी काम करण्यास प्रोत्साहन दिले. शुभांगी ताई यांनी खान्देशी रील्स स्टार हर्षदा महाले ताईंची तालुका अध्यक्षपदी नुकतीच निवड केली. दिपक पाटील यांनी अशी माहिती दिली की ,नविन सुरुवात करण्यासाठी हिची वेळ आहे जेणेकरून आता पैशासाठी आणि सत्ते साठी नाही तर लोकांच्या तसेच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करत आम्ही पुढे येत आहोत आणि येणे गरजेचे आहे .यामुळे शुभांगी ताई साहेब या काल अमळनेर तालुक्यातील दौऱ्यासाठी आलेल्या होत्या आणि लगेच त्या धुळ्याकडे प्रस्थान झाल्या यांत आम्ही अनेक शेतकरी वर्गाशी चर्चा केली व वडील आणि त्यांच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत आहोत.