Breaking
ब्रेकिंग

युवासेनेच्या भव्य सदस्य नोंदणी अभियानात तरुणांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद

शेकडो युवकांनी उपस्थित राहून युवासेनेत दाखल होण्याची तयारी दर्शविली

0 3 9 0 4 0

युवासेनेच्या भव्य सदस्य नोंदणी अभियानात तरुणांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद

शेकडो युवकांनी उपस्थित राहून युवासेनेत दाखल होण्याची तयारी दर्शविली

वि. उपसंपादक :- पंकज पाटील

जळगाव – युवासेना, शिवसेना (शिंदे गट) जळगाव शहराच्या वतीने आज दिनांक ३० मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजेपासून आय.एम.आर. कॉलेज चौक, जळगाव येथे भव्य सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमाला जळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, शेकडो युवकांनी उपस्थित राहून युवासेनेत दाखल होण्याची तयारी दर्शविली.कार्यक्रमाचे नेतृत्व युवानेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, युवासेना कार्याध्यक्ष मा. पूर्वेश सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे, उत्तर महाराष्ट्र सचिव अविष्कार भुसे, जिल्हा परिषद सदस्य व युवानेते प्रतापराव पाटील यांच्या प्रेरणेतून, उत्तर महाराष्ट्र समन्वयक प्रथमेश पाटील, युवासेना कार्यकारिणी सदस्य निखिल चौधरी, व युवासेना विस्तारक किशोर भोसले यांच्या प्रभावी संयोजनात पार पडला.

कार्यक्रमात शहरातील अनेक युवक, विद्यार्थी, व युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. नवोदित युवकांनी युवासेनेची सदस्यता स्वीकारत सामाजिक कार्यात सक्रिय सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.युवासेना जळगाव शहर अध्यक्ष रोहित कोगटा यांनी सर्व सहभागी बांधवांचे मनःपूर्वक आभार मानले असून, भविष्यातही असेच युवकांशी संवाद साधणारे, त्यांना संघटित करणारे कार्यक्रम नियमितपणे राबविले जातील, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरःशिवसेना महिला आघाडी उत्तर महाराष्ट्र विस्तारक सरिता ताई माळी ,युवासेना विस्तारक किशोर भाऊ भोसले ,शिवसेना महानगर प्रमुख संतोष भाऊ पाटील ,युवासेना जिल्हाध्यक्ष रोहित भाऊ कोगटा, शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष उत्तर महाराष्ट्र सचिव जितेंद्र भाऊ गवळी ,युवासेना महानगर उपाध्यक्ष सनी सोनार, युवासेना महानगर उपाध्यक्ष विशाल निकम उपस्थित होते .

कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे कार्यकर्तेः नयन चव्हाण, रोहन सपकाळे, शुभम कस्तुरे, प्रथमेश पाटील, जय कस्तुरे, कल्पेश बागूल, धीरज सोनार, सुशील मोरे, दीपक सोनवणे, पीयूष सोनार, यश पाटील, संदीप पाटील, रोहित गवळी, दिनेश पाटील आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष मेहनत घेतली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 4 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे