महेश पाडेकर यांना राज्यस्तरीय ‘शिक्षकरत्न’ पुरस्कार प्रदान
महेश पाडेकर यांना राज्यस्तरीय ‘शिक्षकरत्न’ पुरस्कार प्रदान
राहुरी तालुका जावेद शेख
शिक्षणाच्या बरोबरीने सामाजिक जबाबदारी जपणारा शिक्षकच खऱ्या अर्थाने आदर्श ठरतो. विद्यार्थ्यांच्या जीवनात आत्मविश्वास जागवणारे आणि मूल्यसंस्कारांची पेरणी करणारे महेश विष्णू पाडेकर, अगस्ती कला वाणिज्य व दादासाहेब रूपवते विज्ञान महाविद्यालय अकोले येथील मानसशास्त्र विषयाचे शिक्षक, यांना जनआरोग्यम संचालित जाणिव फाऊंडेशन तर्फे “लोकनेते बाळासाहेब थोरात शिक्षकरत्न पुरस्कार – २०२५” संगमनेर येथे प्रदान करण्यात आला.
राज्यातील निवडक शिक्षकांमधून पाडेकर यांची आदर्श शिक्षक म्हणून निवड होऊन हा सन्मान मिळाल्याने अकोले तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याला अभिमान वाटत आहे.
पाडेकर यांनी अध्यापनाबरोबरच पर्यावरण संवर्धन, व्यसनमुक्ती जनजागृती, युवकांचा व्यक्तिमत्त्व विकास, संघटनात्मक नेतृत्व, आदिवासी डोंगराळ भागातील शिक्षकांसाठी एक स्तर वेतन श्रेणी मिळवून देण्याचे काम अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या बहुआयामी कार्याचा गौरव राज्यस्तरावर झाल्याने शिक्षक समाजात समाधानाचे व उत्साहाचे वातावरण आहे.
विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्वासाचे बीज पेरणारा शिक्षकच खरा परिवर्तनाचा शिल्पकार ठरतो, या विचारांचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे महेश पाडेकर. त्यांच्या या सन्मानामुळे अकोले तालुक्याला मानाचा तुरा लाभला असून, हा गौरव संपूर्ण शिक्षक समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे. सदर सन्मान हा महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री व महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार सुधीर तांबे राष्ट्रपती पुरस्कार विजेते कळसकर सर अमित पाटणकर बाळासाहेब हेंद्रे ज्ञानदेव गायकर आदी मान्यवरांच्या हस्ते महेश पाडेकर यांना शिक्षक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्राथमिक मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष विलास सावंत, शिक्षक भारती संघटनेचे कोषाध्यक्ष सोमनाथ बोधले, सोमनाथ रहाणे संतोष देशमुख,संजय उकिरडे,अर्जुन शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे विश्वस्त वैभवराव पिचड,विश्वस्त गिरजाजी जाधव, अध्यक्ष सुनील दातीर, सेक्रेटरी सुधाकरराव देशमुख, संस्थेचे शिक्षणाधिकारी संपतराव मालुंजकर, प्राचार्य डॉ.भास्कर शेळके, उपप्राचार्य चांगदेव डोंगरे, पर्यवेक्षक विवेककुमार वाकचौरे ,कला शाखा समन्वयक सुनील टिक्कल, वाणिज्य शाखा समन्वयक डॉ.अनिल धिवर आदी मान्यवरांनी महेश पाडेकर यांचे अभिनंदन केलं .



