अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ महाराष्ट्र राज्य विभागीय प्रसिद्धी प्रमुख पदी श्री. अशोक गाठे यांची निवड

अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ महाराष्ट्र राज्य विभागीय प्रसिद्धी प्रमुख पदी श्री. अशोक गाठे यांची निवड

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २७/ अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य शाखेच्या विभागीय प्रसिद्धी प्रमुख पदी करमाळा येथील श्री कमलादेवी मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री. अशोक गाठे यांची एकमताने निवड झाली.
निवडीस राष्ट्रीय अध्यक्ष शिक्षण महर्षी श्री. भास्करराव टोंपे साहेब, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. संतोष मुळे, मुख्य समन्वयक श्री. अनंत जांगजोड, सचिव श्री. जयकुमार रेळेकर, कार्याध्यक्ष श्री. कैलास धोकटे यांचे मार्गदर्शन लाभले.
याबाबतची माहिती उपाध्यक्ष डॉ. दिनकर पतंगे, संघटक श्री. धनंजय काकडे, जनसंपर्क प्रमुख श्री. वसंत पिसे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री चंद्रकांत चुंबळकर, जिल्हा संघटक श्री. रविशेठ वानरसे यांनी दिली.
या नियुक्तीमुळे महाराष्ट्रासह जिल्हा, तालुका व शहरातील शिंपी समाजाच्या संघटन व एकतेला निश्चितच एक नवे बळ मिळेल, असा आम्हाला ठाम विश्वास वरिष्ठांनी व्यक्त केला.
महासंघाचे विचार तळागाळातील समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकाला संघटनेशी जोडण्यासाठी आपले योगदान अत्यंत मोलाचे ठरेल असे मत यावेळी बोलताना अशोक गाठे व्यक्त केले. आपली ही नियुक्ती केवळ एक सन्मान नाही, तर शिंपी समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी एक मोठी जबाबदारीही आहे. आपली जाणीवपूर्वक कार्यशीलता, संघटन कौशल्य व समाजाप्रती असलेली निष्ठा निश्चितच समाजाला नवीन दिशा देईल आणि संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या विचारांची पताका अधिक उंचावेल असेही गाठे म्हणाले.
यावेळी अखिल भारतीय नामदेव क्षत्रिय महासंघ नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य शाखा, करमाळा तालुका शाखा, सर्व कार्यकारी मंडळ, पदाधिकारी या सर्वांनी अशोक घाटे यांना पुढील यशस्वी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.


