Breaking
ब्रेकिंग

साळी समाजाचे आद्य पुरुष भगवान जिव्हेश्वर यांचा आज जन्मोत्सव

0 8 6 5 0 9

साळी समाजाचे आद्य पुरुष भगवान जिव्हेश्वर यांचा आज जन्मोत्सव

नगर-पृथ्वीवर पहिला हातमाग चालून वस्त्र निर्माण करणारे भगवान जिव्हेश्वर याची दि ७ ऑगस्ट रोजी जयंती आहे महाराष्ट्र,गुजरात, आंध्रप्रदेश, गोवा, मध्यप्रदेश,कर्नाटक या राज्यात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे तर नगरमधील बागडपट्टी,सावेडी, दिलीगेट येथील मंदिरासह जिल्हात साजरी होत आहे अशी माहिती स्वकुळसाळी समाजाचे महेश कांबळे यांनी दिली आहे

साळी समाजाचे कुल दैवत भगवान जिव्हेश्वर याच्या विषयी माहिती देताना ते म्हणाले भगवान जिव्हेश्वरांचे संक्षिप्त चरित्र मध्ये आद्य वस्त्र निर्माता भगवान जीवेश्वर आहे हे आपल्याला समजते. कैलास पुराच्या विराजत असलेल्या प्रथमगणांनी श्री शिवशंकराची स्तूती केली.ते ध्यानावस्थेतून जाग्रस्थ झाले,महाविष्णुस व अमरगणांना पाहून विस्मित झाले.स्मित करून त्यांच्या येण्याचे कारण त्यांनी विचारले.देवांनी निवेदिले,`परमेश्वरा,आदिमायेकडून सॄष्टीची रचना झाली.तिच्या सत्व,रज,तम या त्रिगुणांपासून ब्रम्हा,विष्णू,महेशाची उत्पत्ती झाली.ब्रम्हाने ब्रम्हांडाची रचना करून,पंचमहाभूतांना निर्मून, देव,दानव,मानव व विभिन्न जीवकोटिंना जन्म दिला.पण देव,दानव व मानव इतर प्राण्यासारखे नग्नावस्थेतच आहेत.त्यांच्या लज्जा रक्षणार्थ वस्त्राची निर्मिती झाली पाहिजे.हे महादेवा, वस्त्रानिर्मितीची व्यवस्था आपण करावी अशी विज्ञापना करण्यास आपल्या जवळ आम्ही आलो आहोत’ तेव्हा महादेवांनी आदिमायेचे स्मरण केले.तिने प्रत्यक्ष होऊन श्रीशंकरास म्हटले,`परमेश्वरा, वस्त्र निर्मिणार्‍या पुरूषाची आपण उत्पत्ती करा.’

आदिमायेची ईच्छा स्पष्ट होताच उपस्थित देवांनी परमेश्वराकडे उत्सुकतेने पाहिले देवतांच्या व आदिमायेच्या इच्छिताप्रमाणे महादेवाने आपल्या जिव्हेच्या अग्रभागातून कोटी सूर्याच्या प्रकाशाने युक्त अशा एका दिव्य शिशूस उत्पन्न केले.सारा कैलास आनंदविभोर झाला.आनंद प्रदर्शक मंजुळ घंटानाद होऊ लागला.श्रावण शुद्ध त्रयोदशी सोमवार हा तो दिवस होता.या शुभदिनी कैलासातील सार्‍या सुवासिनींनी नवजात अर्भकास पाळण्यात घालून त्याचे नामकरण केले.श्री शंकराच्या जिव्हेतून उद्भवल्यामूळे`जिव्हेश्वर’ ,त्रिगुणात्मांना साहाय्य कर्ता म्हणून`स्वकुळ’ व सुर्योदय समयी जन्मला म्हणून`सुर्यवंशी’ अशा प्रकारे बालकाचे नामकरण झाले.सार्‍या जगाला वस्त्रप्रावरणांचा पुरवठा करून मनवांच्या लज्जेचे आणि मानाचे रक्षण करो असा आशीर्वाद बालकास दिले

या साळी शब्दाचा उत्पत्तीच्या दॄष्टीने अर्थ तो असा:शाल वॄक्षाची साल साळ्णारे ते साळी, किंवा शाली.ही प्रागैतिहासिक काळातील, समाज हा अर्धनग्न व वन्य अवस्थेत असतानाची घट्ना आहे.मानव वनचर असताना वस्त्रे म्हणून या सालीचाच उपयोग करीत होता. रामायण काळात राम, सीता व लक्ष्मणाने वनवासात जाताना याच सालीची वस्त्रे धारण केली होती.त्यास वल्कले म्हणत.वस्त्रे विणण्याची कला मानवास, साध्य झाल्यानंतर या साल साळणार्‍या साळ्यांनी स्वीकारली व ते साळी या नावानेच समाजात परिचित राहिले.`शाल’ हा शब्द ही या शाल वॄक्षाच्या साली वरूनच प्रचारात आला आहे.ही अतिशय लवचिक असल्याने अंगाभोवती गुंडाळ्ण्यास फारच सोईची आहे. मात्र तिचा आता कोणी उपयोग करीत नाही. शाल वॄक्षाच्या सालीचे काम वॄक्षाच्या सालीचे संरक्षण तसे उघडया नागडया मानवाच्या शरीराचे या सालीद्वारे संरक्षण करणारे ते साळी.भाताच्या साळीस संस्कॄतमध्ये`शाली’ हेच नाव आहे. भाताच्या गाभ्याचे संरक्षण करणारी ती साळ.साधर्म्याने मानवाच्या उघडया शरिराचे वस्त्राद्वारे रक्षण करणारे ते साळी.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 6 5 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे