सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रांगोळी स्पर्धाचे आयोजन

सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रांगोळी स्पर्धाचे आयोजन
राहुरी तालुका जावेद शेख
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात रांगोळी स्पर्धांचे योजना करण्यात आले.
2 आॅक्टोंबर ते 8 आॅ्टोंबर दरम्यान वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये वन्यजीवांविषयी प्रेम निर्माण व्हावे, त्यांना निसर्गाची गोडी लागावी या हेतुने दरवर्षी सप्ताहाचे आयोजन केले जाते. विद्यार्थांनी आनंदाने या स्पर्धेत भाग घेतला.
मोरे,वाघ,सिंह,ससा,हत्ती,जिराफ,इत्यादी प्रकारच्या रांगोळी काढण्यात आल्या.
75 विद्यार्थांनी सहभाग घेतला. यापैकी 21 स्पर्धकांची प्रथम, द्वितीय, तृतीय, उत्तेजनार्थ निवड करण्यात आली. कलाध्यापक साळवे सर यांनी परीक्षण केले. हरित सेने सचिव तुकाराम जाधव यांनी नियोजन केले.
कु. जान्हवी माने, आरोही भिंगारदे, पायल दळे, सोनाली कटारनवरे, ईश्वरी बर्डे, भक्ती बेल्हेकर यांचा प्रथम क्रमांक आला. सर्व यशस्वी स्पर्धेकांचे विद्यार्थ्यांचे संस्थेचे सभापती डाॅ. प्रमोद रसाळ साहेब , सचिव -डॉ.महानंद माने साहेब, खजिनदार-महेश घाडगे साहेब, तसेच शाळेचे मुख्याध्यापक -अरुण तुपविहिरे सर, उपमुख्याध्यापक -बाळासाहेब डोंगरे सर, पर्यवेक्षक -मनोज बावा सर, जितेंद्र मेटकर तसेच शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
सदर स्पर्धा नियोजनासाठी तुकाराम जाधव सर,कुंभारे सर,संतोष जाधव सर,कराळे मॅडम ,यांनी परिश्रम घेतले.



