Breaking
ब्रेकिंग

हेवन पार्क मित्रमंडळाच्या वतीने दांडिया महोत्सव उत्साहात साजरा

0 8 9 9 4 4

हेवन पार्क मित्रमंडळाच्या वतीने दांडिया महोत्सव उत्साहात साजरा

पुणे / विशेष प्रतिनिधी:-(शिवा म्हस्के)

दांडिया रास हा गुजरातचा पारंपरिक नृत्य प्रकार आहे,जो देवी दुर्गेने महिषासुराचा वध केल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये सादर केले जाते. तसेच महाराष्ट्र अनेक ठिकाणी दांडिया महोत्सव उत्साहात साजरा केला जातो.तसेच
पुणे विविध भागात दांडया आयोजन केले जाते. पुणे हेवन पार्क मित्रमंडळाच्या वतीने जरांडे लाॅन या ठिकाणी दांडिया आयोजन करण्यात आले.या वेळी अनेक स्पर्धा घेण्यात आल्या अनेक ग्रुप दांडिया फेर्या पार पडल्या उत्कृष्ट दांडिया ग्रुपसला, तसेच वैयक्तिक उत्कृष्ट दांडिया स्पर्धाकला बक्षीस वितरण करण्यात आले या वेळी अनेक प्रोत्साहन बक्षिसाचे देण्यात आले. हेवन पार्क मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षी अनेक उपक्रम राबविले जातात. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव, पंधरा ऑगस्ट ध्वजारोहण सुध्दा सेवानिवृत्ती अधिकारी कर्मचारी उपस्थित हे कार्यक्रम घेतले जातात. या ठिकाणी कलागुणांना वाव व प्रोत्साहन देण्यासाठी हेवन पार्क मित्रमंडळाच्या हे सांस्कृतिक कार्यक्रम नेहमी घेत असते.

यावेळी या कार्यक्रमाला सहकार्य उंड्रीचे सरपंच निवृत्ती बांदल (आण्णा) यांनी सहकार्य केले तसेच हेवन पार्क संदिप जरांडे,,अध्यक्ष शुभम जाधव,उपअध्यक्ष शुभम माळी, खजिनदार संतोष शिंदे, कार्याध्यक्ष यश देसाई, सचिव रोहित भापकर, ओमकार भोसले, राजेश भोसले, ऱोहन मगदुम, सोयम औटी, किरण दौंडकर, आनंद जगदाळे, पुष्कर सोमनकर, भुवन कांबळे आदी मंडळाचे कार्यकर्ते हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.

4.5/5 - (2 votes)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 4 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे