Breaking
ब्रेकिंग

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निखिल चांदगुडे आयोजित महिला गृह उद्योग प्रदर्शन

0 3 9 0 7 0

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त निखिल चांदगुडे आयोजित महिला गृह उद्योग प्रदर्शन

प्रतिनिधी: सुर्यकांत होनप

करमाळा: दि. १०/ महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त महिलांसाठी भव्य उद्योग प्रदर्शनाचे आयोजन शिवसेना जिल्हा समन्वयक निखिल भैया चांदगुडे यांनी दिनांक 9 फेब्रुवारी ते 11 फेब्रुवारी रोजी छोटू महाराज सिनेमा थिएटर बायपास रोड करमाळा येथे केले आहे. या महिला उद्योग प्रदर्शनाचे उद्धघाटन दिग्विजय बागल यांच्या हस्ते करण्यात आले. हा उपक्रम स्तुत्य असल्याचे मत मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन शिवसेना जिल्हा युवा नेते दिग्विजय बागल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.

या प्रदर्शनाचे आयोजन सलग तीन दिवस असून प्रदर्शनातील स्टॉल बुकिंग ची सुरुवात झालेली आहे. स्टॉलची अरेंजमेंट, टेबल, खुर्ची व्यवस्थित विभागणी व्यवस्थापनाकडून केली आहे. या कार्यक्रमामध्ये खास महिलांसाठी करमाळ्यातील नामांकित डेव्हलपर्स तर्फे प्लॉट खरेदी व घर खरेदी वर आकर्षक सूट व गिफ्ट मिळणार आहे. सरकार तर्फे महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती देणे व वाटप होणार आहे. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून यश कल्याणासाठी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश भाऊ करे पाटील होते.

महिला सक्षमीकरणासाठी निखिल चांदगुडे यांनी आयोजित केलेला महिला गृह उद्योग प्रदर्शन मेळावा करमाळा तालुक्यातील पहिलाच उपक्रम असून उद्योग व्यवसायात भरारी घेण्यासाठी महिला भगिनींना दिलेले व्यासपीठ नक्कीच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसेनेच्या 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण या धोरणानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचा समाजसेवा चा वारसा जपण्याचे काम सामाजिक उपक्रमाद्वारे करून एक आदर्श निर्माण केला आहे. या महिला गृह उद्योग प्रदर्शनामध्ये करमाळा शहर तालुक्यातील महिला उद्योजकांनी यामध्ये सहभाग नोंदवला असून या कार्यक्रमामुळे आपल्या उद्योग व्यवसायांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचे काम शिवसेनेच्या माध्यमातून निखिल भैया चांदगुडे यांनी केले असल्याने महिला वर्गातून त्यांचे कौतुक होत आहे. या महिला उद्योग प्रदर्शन कार्यक्रमास करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून महिला उद्योगांना मिळत असलेल्या प्रोत्सानामुळे शिवसेनेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व सत्कार युवा सेना जिल्हा समन्वयक व या प्रदर्शनाचे आयोजक निखिल चांदगुडे यांनी केला. यावेळी कृषी उत्पन्न समितीचे मा. सभापती शिवाजी बंडगर, यशकल्याणी संस्थेचे प्रा. गणेश करे-पाटील, भाजपचे अध्यक्ष जगदीश अगरवाल, मकाईचे संचालक सतीश नीळ, सा. कमलाई नगरीचे संपादक जयंत दळवी, अँड प्रियाल अगरवाल, नाना कारंडे, विकी शिंदे, शिवसेना पदाधिकारी मान्यवर, चांदगुडे परीवार व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

5/5 - (1 vote)

SWNews

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 9 0 7 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे